चिमुकल्या वारकऱ्यांची निघाली दिंडी…
चिमुकल्या वारकऱ्यांची निघाली दिंडी…
नेवासा प्रतिनिधी– नेवासा येथील मुळा एज्युकेशन सोसायटी संचलित ज्ञानदीप इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वतीने संस्थेचे संस्थापक मा.खासदार यशवंतराव गडाख साहेब यांच्या प्रेरणेने व संस्थेचे उपाध्यक्ष उदयन दादा गडाख यांच्या मार्गदर्शनाने आषाढी एकादशीनिमित्त काढलेल्या दिंडी व पालखी सोहळ्याने ढोल, ताशे, टाळ , लेझीम व हरीपाठाच्या गजराने ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बाल दिंडी सोहळा पार पडला.
नेवासा येथील मुळा एज्युकेशन सोसायटी संचलित ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने येथील विद्यार्थ्यांचे आषाढी एकादशीनिमित्त पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
यावेळी वारकरी वेशभूषा आणि टाळ मृदुंगाच्या गजरात अश्वरोहण, लेझीम पथक व ढोल ताशांच्या गजरात, भगवे झेंडे हाती घेऊन हरिनामाचा गजर करीत ज्ञानदीप स्कूल ते नेवासा फाटा परिसर हे अंतर पायी चालत अत्यंत भक्तिमय अशा वातावरणात बालगोपाळांनी पार पाडले.यावेळी संपूर्ण परिसर टाळ मृदुगांनी व ढोल ताशांच्या गजराने दुमदुमून गेला.
श्री ज्ञानेश्वर कॉलेज जवळ पालखीचे पूजन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.अरुण घनवत, प्राचार्य वैभव आढाव, असिफ बाबुलाल आदी शिक्षकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पायी दिंडीचे प्रस्थान झाले. यावेळी ग्रामस्थ व पालक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.माजी मृदा व जलसंधारण मंत्री आमदार शंकरराव गडाख साहेब, संस्थेचे सचिव उत्तमराव लोंढे, सहसचिव डॉ.विनायक देशमुख आदींनी या उपक्रमाचे स्वागत केले.शिक्षक देवदत्त दरंदले, पांडुरंग उदे, सतीश डिके, केतन पंडित, कांचन राजळे, माधुरी बोराडे, मंजुश्री ढाकणे, मंजुषा चरवंडे, असिफ बाबूलाल ,भारत शिंदे, छाया भोगे यांनी दिंडीचे नियोजन केले होते.सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद यांचे देखील दिंडीसाठी मोलाचे सहकार्य लाभले. शेवटी विद्यार्थ्यांनी रिंगण करून विविध नृत्य व फुगडीचा आनंद लुटला आणि फराळाच्या कार्यक्रमाने दिंडीची सांगता झाली.