सात्विक आहार पवित्र आहे.याचे दान करा…ह.भ.प.केदार महाराज
सात्विक आहार पवित्र आहे.याचे दान करा…ह.भ.प.केदार महाराज
मानवत/प्रतिनिधी दानधर्म करतांना नेहमी मनमोकळे पणाने दानधर्म करा.सात्विक आहार हे पवित्र आहार आहे.असे रिसोड तालुक्यातील श्रीक्षेत्र पेनबोरी येथील हे.भ.प.केदार महाराज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पेनबोरी ते पंढरपूर पायीं दिंडी काढण्यात आली.या दिंडी चे मानवत येथील नवीन दत्त मंदिरात आगमन झाले.या पायीं दिंडी चे स्वागत मानवत येथील बद्रीप्रसाद काबरा परिवार व श्रीकिसन रामनिवास सारडा परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात आले.या याप्रसंगी कीर्तनातून आपले विचार व्यक्त करताना सांगितले.
ते पुढे म्हणाले जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जवळपास आठ ते नऊ पिढ्यापासून पंढरपूर येथे दिंडी काढण्यात येते. एकदा देवाने संत तुकाराम आला देण्याविषयी इच्छा व्यक्त केली असताना त्यांनी तुकाराम मला सांगितले तुकाराम काय पाहिजे ते सांग मी तुला देतो. तुकाराम महाराजांनी देवाकडे काहीच मागणी केली नाही.तुम्ही रात्रंदिवस भोजन करतात. याबरोबर भजन ही महत्त्वाची आहे. हम प्यार दिंडीचे हे महत्व आहे ज्या ठिकाणी आम्ही भोजन करतो त्या ठिकाणी आम्ही कमीत कमी पाच भजन कीर्तन जरूर करतोत. ज्याचे खावे मीठ त्याचे करावे निट.हे आमच्या दिंडीचे नियोजन आहे.अशा माणसाला दानधर्म करा तो सात्विक वृत्तीचा असला पाहिजे.तरच दानधर्म केल्याचे पुण्य मिळते.दान कुणाला करायचे हे महत्त्वाचे आहे.यातुन आपला उध्दार झाला पाहिजे.धन संपत्ती जरी अमाप असेल मनमोकळे पणाने दानधर्म करा.दानधर्म केल्याने धन संपत्ती मध्ये वाढ होते.जीवन धन्य होऊन जाते.जीवनाचे कल्याण होते.असे विचार पेनबोरी येथील दिंडी चे मार्गदर्शक ह.भ.प. केदार महाराज देशमुख यांनी मानवत येथील नवीन दत्त मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या दिंडीचे स्वागत प्रसंगी आपले विचार व्यक्त करताना सांगितले.
मानवत चे उद्योजक व दानशूर श्री किसन रामनिवास विभागाच्या वतीने इन डिटेल वाडकर यांना वाटप करण्यात आले. पेन बोरी येथील दिंडीचे गेल्या सहा ते सात वर्षापासून मानवत मध्ये आगमन होते. बद्रीप्रसाद काबरा व श्रीकृष्ण रामनिवास सारडा कुटुंबीयांच्या वतीने या दिंडीचे स्वागत करण्यात येते. यावर्षी दिंडीमध्ये 25 वारकरी व काही महिला दिंडी द्वारे पंढरीला जात आहे.