आपल्यला लोन पाहिजे का ?
आपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताशालेय शिक्षण व क्रीडासरकारी योजना

सौ.कौशल्याबाई रघुनाथ आगळे लॉ कॉलेज सुरू होणार…

सौ.कौशल्याबाई रघुनाथ आगळे लॉ कॉलेज सुरू होणार…

नेवासा प्रतिनिधी – येथील सौ.कौशल्याबाई रघुनाथ आगळे बहुउद्देशीय प्रतिष्ठान नेवासा फाटा संचलित सौ.कौशल्याबाई रघुनाथ आगळे लॉ कॉलेज चालू शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यास राज्य सरकारची परवानगी मिळाली असल्याने नेवासा तालुक्यात नवे शैक्षणिक क्षेत्रात क्रांतीकारक पाऊल पडले आहे.नेवासा येथे विधी महाविद्यालय सुरू होत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष माजी प्राचार्य रघुनाथ आगळे यांनी दिली.
या संदर्भात प्राचार्य आगळे यांनी सांगितले आहे की, येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत विधी महाविद्यालय सुरू करण्याकरिता राज्य सरकारकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. या प्रस्तावाची विद्यापीठामार्फत व सरकारमार्फत छाननी होऊन सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून लॉ कॉलेज सुरू करण्यास उच्च शिक्षण विभागाने मंजुरी दिली आहे.हा कोर्स तीन वर्षांचा असून, प्रवेश क्षमता ६० आहे.ज्याने सीईटी परीक्षा दिली आहे , कोणत्याही शाखेचा पदवीधर विद्यार्थी प्रवेशास पात्र आहे. नेवासा येथे लॉ कॉलेज असल्यामुळे ग्रामीण भागातील मुला-मुलींची कायदेविषयक शिक्षणाची गैरसोय दूर झालेली आहे. येथे जिल्हा सत्र न्यायालय असल्यामुळे याचा निश्चितपणे फायदा विद्यार्थी- विद्यार्थिनींना होणार आहे. प्रवेशासाठी इच्छुकांनी महाविद्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन प्राचार्य आगळे यांनी केले आहे.
ज्ञानेश्वर कॉलेजचे माजी प्राचार्य रघुनाथ आगळे व माजी कुलगुरू अशोक ढगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली विविध शैक्षणिक संस्थांनी आत्तापर्यंत नेत्रदीपक प्रगती केलेली असून, चालू शैक्षणिक वर्षापासून लॉ कॉलेज सुरू करण्यास परवानगी मिळाल्यामुळे नेवासात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, अनेक मान्यवरांनी आगळे यांचे अभिनंदन केले आहे.
या विद्यालयासाठी मान्यता प्राप्त शैक्षणिक अनुभव असलेले प्राचार्य व शिक्षकांची नेमणूक केलेली आहे.तसेच प्राचार्य रघुनाथ आगळे आणि प्राचार्य अशोक ढगे यांच्या प्रशासकीय अनुभवाचा फायदा या विद्यालयास मिळणार असल्याने सदर विद्यालयास मोठा प्रतिसाद मिळणार आहे.

नेवासा येथे जिल्हा सत्र न्यायालय असल्याने त्याचा निश्चित मोठा या विद्यालयाच्या भावी वकिलांना विद्यार्थ्यांना होणार आहे. प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थानी महाविद्यालयातील माणिक गवळी सरांनी संपर्क करावा – प्राचार्य रघुनाथ आगळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button