वडिलांचे छत्र हरवलेल्या शिंदे कुटुंबीयांना नागनाथ घीसेवाड यांनी केली आर्थिक मदत:
वडिलांचे छत्र हरवलेल्या शिंदे कुटुंबीयांना नागनाथ घीसेवाड यांनी केली आर्थिक मदत:
***********
2 मुलांच्या 12 वी पर्यंतच्या मोफत शिक्षणाचीही घेतली जबाबदारी
***********
भोकर (तालुका प्रतिनिधी) समाजामध्ये अनेक कुटुंब आर्थिक परिस्थितीने कमकुवत आहेत, काही कुटुंबातील प्रमुख व्यक्ती मयत झाल्याने फार मोठे आर्थिक संकट कुटुंबावर कोसळते, काही वेळा अपघाती मृत्यू झाल्याने सुद्धा अनेक कुटुंबावर वाईट वेळ येते अशावेळी सामाजिक जाण असलेल्या लोकांनी कुटुंबाला आर्थिक मदत करणे महत्वाचे आहे भोकर तालुक्यातील किनी येथील हनुमंत पाटील यांचा मोटार सायकल अपघाताने मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली अशा उघड्यावर पडलेल्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी भोकर तालुक्याचे बहुजन नेते नागनाथ भिसे वाढ यांनी पुढाकार घेऊन आर्थिक मदत केली वडिलांचे छत्र हरवलेल्या 2 बालकांच्या 12 वी पर्यंत शिक्षणाची, राहण्याची, भोजनाची, कपड्याची मोफत सोय करण्याची जबाबदारी घेतल्याने या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.
भोकर तालुक्यातील मूळ थेरबन येथील रहिवासी असलेला हनमंत सटवाराव शिंदे( 32) हा युवक गेली 15 वर्षापासून कीनी येथे वास्तव्यास आहे महिनाभरापूर्वी मोटार सायकल अपघात झाल्याने सदर युवकाच्या डोक्याला गंभीर मार लागला होता मुंबई येथील कामा हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार चालू होते 9 जुन 2024 रोजी त्याचा मृत्यू झाला त्यामुळे हे कुटुंब उघड्यावर पडले होते.
नागनाथ घीसेवाडानी केली आर्थिक मदत
***********
वडिलांचे छत्र हरवलेला हनमंत शिंदे हा युवक अतिशय प्रेमळ आणि शांत स्वभावाचा होता गरिबीमध्ये काम करून आपले कुटुंब चालवत असताना त्याचा अपघाती मृत्यू झाला पत्नी आणि दोन लहान बालके उघड्यावर पडले याबाबत माहिती मिळताच भोकर तालुक्याचे बहुजन नेते नागनाथ विषय वाढ यांनी 11 जून 2024 रोजी किनी येथे जाऊन शिंदे कुटुंबीयांचे सांत्वन केले त्यांना सद्यस्थितीत लागणारी आर्थिक मदत केली तसेच सामाजिक जाण ठेवून दोन्ही छोट्या बालकांच्या 12 वी पर्यंतच्या शिक्षणाची मोफत व्यवस्था त्यांच्या राहण्याची, भोजनाची, कपड्याचीही व्यवस्था करण्याची जबाबदारी स्वीकारली या सामाजिक कार्याबद्दल घीसेवाड यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.