रॉयल्टी काढली कॅनाल दुरुस्तीच्या कामासाठी; अन् हजारो ब्रास मुरुमाची खाजगी मध्ये विक्री?
रॉयल्टी काढली कॅनाल दुरुस्तीच्या कामासाठी; अन् हजारो ब्रास मुरुमाची खाजगी मध्ये विक्री?
********
भोकर तालुक्यातील भोशी शिवारातील प्रकार
**********
शासनाचा बुडतो लाखो रुपयांचा महसूल
**************
भोकर तालुका प्रतिनिधी-बी.आर.पांचाळ भोकर तालुक्यात अवैधरित्या चोरट्या मार्गाने मुरुमाचे उत्खनन करून विक्री करण्याचा धंदा चोरट्या मार्गाने केल्या जातो उर्ध्वपैनगंगा प्रकल्पाच्या कालव्याचे काम चालू आहे संबंधित कंत्राटदारानी त्या कामासाठी रॉयल्टी काढली असून त्या नावाखाली भोशी शिवारात हजारो ब्रास मुरूम खाजगी मध्ये विक्री केल्या जात असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.
भोकर तालुक्यात शासनाच्या महसूल विभागाकडून मुरुमाचे उत्खनन करण्यास बंदी आहे, मुरूम खोदण्यासाठी शासनाच्या परवानगीशिवाय खोदता येत नाही मात्र रात्रीच्या वेळी चोरून अवैधरित्या मुरूम खोदण्याचा धंदा चालूच आहे लपून-छपून चोरट्या मार्गाने मुरमाची विक्री केली जाते, तहसील कार्यालयाचे भरारी पथक मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असताना दिसत आहे, काही शासकीय टेंडर असलेल्या कंत्राटदारांना रॉयल्टी भरून कामासाठी मुरूम खोदण्याचे परवानगी दिली जाते मात्र परवानगी दिलेल्या ब्रास पेक्षा हजारो ब्रास मुरूम अनाधिकृतरित्या खोदल्या जातो त्याचे नोंद कुठेच नाही शासनाचा महसूल मात्र बुडविले जातो.
रॉयल्टी कॅनॉलच्या कामाची ;खाजगी मध्ये मुरमाची विक्री
************
भोकर तालुक्यातील भोशी येथील शिवारात उर्धव पैनगंगा प्रकल्पाच्या कालव्याचे काम चालू आहे संबंधित गुत्तेदार काम उरकण्याचे प्रयत्न करत असून कामाचा दर्जा मात्र राहिलेला नाही या कामासाठी शासनाकडून मुरमाची रॉयल्टी काढण्यात आली मात्र त्या रॉयल्टी च्या नावाखाली इतर खाजगी कामांना शेतामध्ये टाकण्यासाठी घर बांधकामासाठी मुरूम सर्रास विक्री केल्या जात आहे हजारो ब्रास मुरूम खाजगी मध्ये विक्री करून शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडविल्या जात असताना संबंधित महसूल विभागाचे अधिकारी मात्र गप्प आहेत या गंभीर प्रकाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी नागरिकातून होत आहे