रायखोड शिवारात झालेल्या महिलेच्या खुनाच्या आरोपातून आरोपीची निर्दोष सुटका.
रायखोड शिवारात झालेल्या महिलेच्या खुनाच्या आरोपातून आरोपीची निर्दोष सुटका.
भोकर प्रतिनिधी : मौजे शिवणी ता.किनवट येथिल सखाराम जगरूप आडे हे अभिराज बार अँड रेस्टॉरंट मध्ये काम करण्यासाठी भोकर येथे आले होते व चिखलवाडी येथिल मारोतराव कत्ते यांचा घरी किरायाने रूम घेऊन पत्नी शोभाबाई व मुलासह राहत होते.
दिनांक 24 एप्रिल 2022 रोजी यातील फिर्यादी सखाराम आडे व मुले गावाकडे गेले होते व पत्नीची तबियत बरी नसल्यामुळे ती घरी होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी दिनांक 25 एप्रिल 2022 रोजी पोलिसांचा फोन आला व त्यांनी कळवले की तुमच्या पत्नीचे प्रेत रायखोड शिवारात बाबुराव टेकाळे यांचे शेतातील नाल्यात आहे. त्यानंतर फिर्यादी सखाराम आडे यांनी आरोपी सुरेश बळीराम आडे यांचा विरुद्ध तक्रारी आर्ज दिला त्यावरून पोलिसांनी आरोपी सुरेश बळीराम आडे यांचा विरुद्ध गु र न 146/2022कलम 302,504,506 नुसार गुन्हा दाखल केला होता व आरोपीला दिनांक 25 एप्रिल 2022 ला पोलिसांनी अटक केली होती. व सदर गुन्हाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक तांबोळी यांनी केला व दोषारोप पत्र पाठवले होते. त्यामध्ये आरोपीने अनैतिक संबंधातून फिर्यदीची पत्नी शोभाबाई सखाराम आडे हिला रायखोड शिवारात नेऊन डोक्यात दगड घालून तिचा खून केला असा आरोप केला होता. एक CCTV फुटेज पण सदर तपासात जप्त केला होता ज्यामध्ये एक पुरुष व एक माहीला डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथून गाडीवर जातानाचा आहे पण त्या पुरुष व महिलेने त्यांचा चेहऱ्याला रुमालने पूर्णपणे बांधून घेतलेले असल्यामुळे त्यांची चेहरे स्पष्ट पणे दिसत नव्हते.
सरकारी पक्षातर्फे सदर प्रकरणात एकूण 14 साक्षीदार तपासले होते परंतु आरोपी विरुद्ध कोणताही पुरावा मिळून आला नसल्यामुळे भोकर येथिल जिल्हा न्यायाधीश वाय. एम. एच. खरादी यांनी आरोपी सुरेश बळीराम आडे यांना सदर प्रकरणातून 19 ऑगस्ट 2024 रोजी निर्दोष सुटका केली.सदर आरोपी सुरेश बळीराम आडे हा गेल्या दोन वर्षांहून जास्त काळ जेल मध्ये होता .आरोपी सुरेश बळीराम आडे यांच्या तर्फे ॲड. शिवाजी कदम नागापूरकर यांनी बाजु मांडून आरोपी सुरेश बळीराम आडे यांची निर्दोश मुक्तता केली.