मंडपात चिखल…वरून पावसाचे पाणी….तरीही शिवभक्त मंडपा समोर थांबलेलेच….अशीही शिव भक्ती
मंडपात चिखल…वरून पावसाचे पाणी….तरीही शिवभक्त मंडपा समोर थांबलेलेच….अशीही शिव भक्ती
************
नांदेड( बी. आर. पांचाळ)
शिव महापुराण कथेचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कथाकार पंडित प्रदीप जी मिश्रा यांच्या वाणीतून शिव कथा ऐकण्यासाठी परम भाग्य समजले जाते त्यांची कथा ऐकण्यासाठी भाविका भक्त देशभरात ठिकठिकाणी जातात नांदेड येथे शिवमहापुराण कथा 23 ऑगस्ट रोजी सुरू झाले लाखोंचा जनसागर उसळला होता रात्री मुसळधार पाऊस झाल्यामुळे मंडपात त्यांनीच पाणी झाले सर्वत्र चिखल झाला पावसाचे परिस्थिती पाहून संयोजन समितीने कथा दोन दिवस स्थगित करून ऑनलाईन कथा ऐकण्याचे आवाहन केले तरीही शिवभक्त दुसऱ्या दिवशी 24 ऑगस्ट रोजी मंडपाच्या बाहेर थांबलेले होते पंडित प्रदीप प्रदीप जी मिश्रा यांची शिव कथा ऐकणे म्हणजे जीवाचा उद्धार करून घेणे होय शिवभक्ति सरळ सोपी भक्ती आहे एक लोटाजल सर्व समस्या का हल अशा शब्दात पंडितजी शिवमहिमा सांगतात तुम्ही श्रद्धेने शिवाचे भक्ती करा तो तुमच्यासाठी नक्कीच धावून येतो असे ते सांगत असतात त्यांच्या वाणीतून निघालेले शब्द अत्यंत माउलीपासून ते शब्द ऐकण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय उसळतो नांदेडमध्येही तसेच झाले पाऊस चिखल असला तरी दुसऱ्या दिवशी भाविक भक्त मंडपाच्या बाहेर थांबलेलेच होते हे कळताच पंडित प्रदीप जी मिश्रा कथास्थळी येऊन भाविकांना आवाहन करून गेले पावसामुळे चिखल झाला आहे पाऊस चालू आहे बसता येत नाही म्हणून कथा दोन दिवस स्थगित करण्यात आली ऑनलाइन कथा ऐकावी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन करून ते निघून गेले शिवभक्तांचे भक्ती यावेळी दिसून आली