भोकर पोलीस स्टेशनला नूतन पोलीस निरीक्षक अजित कुंभार झाले रुजू
भोकर पोलीस स्टेशनला नूतन पोलीस निरीक्षक अजित कुंभार झाले रुजू
************
भोकर ( बी.आर.पांचाळ) भोकर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड यांची बदली झाल्यानंतर नवे पोलीस निरीक्षक म्हणून अजित कुंभार यांनी 26 सप्टेंबर रोजी पदभार स्वीकारला आहे.
भोकर पोलीस स्टेशनचा पदभार मागील आठ महिन्यापासून सुभाषचंद्र मारकड यांनी चांगल्या प्रकारे सांभाळला होता,निवडणूक संदर्भात त्यांची बदली नायगाव येथे झाली असून नायगाव येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांना भोकर येथे नियुक्ती देण्यात आली त्यांनी येथील पदभार स्वीकारला आहे भोकर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले शहरातील वाहतुकिची वाईट अवस्था,वाढत चाललेले अतिक्रमण या संदर्भात पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला शहरातील सर्व समस्या दूर करण्यासाठी माझे प्रयत्न राहतील सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे असे ते म्हणाले भोकर शहरात लपून छपून अवैध धंदे चालू असून गुटखा विक्री,देशी दारूची अवैध विक्री, यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे