सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रसामाजिक कार्य

भोकर तालुक्यात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत पाणलोट रथयात्रेचे उत्स्फूर्त स्वागत

भोकर तालुक्यात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत पाणलोट रथयात्रेचे उत्स्फूर्त स्वागत
*************

भोकर ( तालुका प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागामार्फत काढण्यात आलेल्या पानलोट रथयात्रेचे भोकर तालुक्यातील हाडोळी व कामनगाव येथील ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले यावेळी कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी हजर होते.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना व पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने जलसंधारणाच्या जनजागृतीसाठी महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यातील 140 प्रकल्प क्षेत्रामधील 1530 गावापर्यंत पाणलोट यात्रा जाणार आहे भोकर तालुक्यात 15 मार्च रोजी ही रथयात्रा दाखल झाली होती.

हाडोळी व कामनगाव येथील ग्रामस्थांनी या रथयात्रेचे भजन दिंड्यांच्या तालामध्ये स्वागत केले प्रारंभी रथाचे पूजन करून गावातून प्रभात फेरी काढण्यात आली मृदंग टाळ वाजवत पानलोटाच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी शेतकरी गावातील महिला बचत गट जि. प शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, जलसंधारण विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश होता. निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा प्रश्नमंजुषा स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षिसे देण्यात आली, घोषवाक्य देण्यात आले, जलसंधारण व मृद संधारण करण्याबाबत हातात माती घेऊन शपथ घेण्यात आली पाणलोटाची संकल्पना चल चित्राच्या माध्यमातून समजावून देण्यात आली तसेच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध घटकांची माहिती शेतकऱ्यांना व महिला बचत गटांना देण्यात आली यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी आर.डी. रणवीर, जलसंधारण अधिकारी दयासागर गायकवाड, तंत्र अधिकारी के. एम. जाधव, तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव यांच्यासह कृषी सहाय्यक डहाळे, जाधव, काकडे, सीतावार, बोईनवाड यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button