भोकरच्या रेल्वे हधीत अनाधिकृत केलेले विमल स्कूलचे बांधकाम पाडण्यासाठी आमरण उपोषणाचा इशारा
भोकरच्या रेल्वे हधीत अनाधिकृत केलेले विमल स्कूलचे बांधकाम पाडण्यासाठी आमरण उपोषणाचा इशारा
भोकर प्रतिनिधी – येथील वार्ड क्रमांक २ मधील विमल इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलचे अनाधिकृत बांधकाम रेल्वे हद्दीत करण्यात आल्याने ते तात्काळ पाडण्यात यावे बांधकामाची परवानगी देणाऱ्या नगरपालिका मुख्याधिकाऱ्यावर कारवाई करावी या मागणीसाठी दि.१३ ऑगस्ट २०२४ पासून भोकर उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा स्वप्नील केशवराव गाढे यांनी एका लेखी निवेदनाद्वारे केला आहे.
स्वप्निल गाढे यांनी दिलेल्या तक्रारीत असे म्हटले की विमल इंग्लिश स्कूल इंटरनॅशनल स्कूलचे संचालक ईश्वर रतन जाधव,डॉ.राम रतन जाधव, लक्ष्मण रतन जाधव यांनी वार्ड क्र.२ गट क्र.५५४ मध्ये बेकायदेशीर रेल्वे हद्दीत बांधकाम केले सदर बांधकामाची चौकशी करून केलेले बांधकाम पाडावे बांधकामाची परवानगी देणारे नगर परिषदेचे मुख्याधिकारी व परवानगी घेणारे यांचेवर कठोर कारवाई करण्यात यावी म्हणून दि.२५ जून दि. ८ जुलै दि. ११ जुलै दि.१५ जुलै२०२४ रोजी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी तक्रार केली होती परंतु या तक्रारीच्या अनुषंगाने योग्य ती कारवाई झालेली नाही मुख्याधिकारी नगर भोकर यांनी इंटरनॅशनल विमल स्कूल बांधकामासाठी किती क्षेत्रफळाची परवानगी दिली ? परवानगी देते वेळेस रेल्वे विभागाचे ना हरकत घेतले काय ? अंदाजपत्रक जागेचा नकाशा जायमोक्यावर जाऊन चौकशी केली का ? या सर्व बाबींची सविस्तर चौकशी करून स्कूलचे बांधकाम अनाधिकृत बेकायदेशीर असल्याने ते तात्काळ पाडून परवानगी देणारे व घेणाऱ्या संबंधितावर योग्य ती कारवाई करावी अन्यथा दि.१३ ऑगस्ट २४ पासून स्वप्निल गाढे हे उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहेत. सदरील तक्रारीच्या प्रति जिल्हाधिकारी,तहसीलदार भोकर यांनाही देण्यात आल्या आहेत.