पारंपारिक शिक्षण घेणाऱ्या मुलींनाही मोफत शिक्षण योजना लागू करा ; छात्रभारती विद्यार्थी संघटनेची मागणी
पारंपारिक शिक्षण घेणाऱ्या मुलींनाही मोफत शिक्षण योजना लागू करा; छात्रभारती विद्यार्थी संघटनेची मागणी
पारंपारिक शिक्षण घेणाऱ्या मुलींनाही शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती देण्याचा निर्णय जाहीर करावा, अशी मागणी छात्रभारती बुलढाणाच्या वतीने ६ ऑगस्ट रोजी निवेदन देऊन करण्यात आली.
व्यावसायिक पदवी पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या शैक्षणिक शुल्काची १०० % प्रतिपूर्ती देण्यासाठीचा शासन निर्णय ८ जुलै रोजी जाहीर करण्यात आला आहे.
मात्र यात आर्ट्स,कॉमर्स व सायन्स या शाखेत प्रवेश घेणाऱ्या सर्व अभ्यासक्रमांना वगळल्यामुळे १२ लाखांहून अधिक पारंपारिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना या योजनेचा कुठलाही लाभ मिळणार नाही. महाराष्ट्रात आजही पारंपारिक शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या जास्त आहे.अनेक ठिकाणी परवडणारे शिक्षण नसल्यामुळे मुलींना पदवी पदव्युत्तर शिक्षण देण्यापेक्षा लग्न लाऊन दिले जाते.
कृपया सरसकट महाराष्ट्रातील मुलींचे सर्व अभ्यासक्रमाचे शुल्क माफ करणे गरजेचे आहे. पारंपारिक अभ्यासक्रमातील मुलींच्या शैक्षणिक शुल्काची १०० % शुल्क प्रतिपूर्ती देण्याची तरतूद करून मुलींच्या मोफत शिक्षण योजनेत पारंपारिक अभ्यासक्रमाचा समावेश व्हावा व सुधारित शासन निर्णय निर्गमित करावा अशी मागणी छात्रभारती विद्यार्थी संघटना उपरोक्त निवेदनाद्वारे आपल्याकडे करत आहे.
यावेळी छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष ओम तांगडे सोबतच मेहकर तालुका अध्यक्ष आदिनाथ गारोळे,तालुका सचिव पवन वायाळ,तालुका सल्लागार अलीयार शेख उपस्थित होते.