पंचांची भुमिका न्यायाधीशासारखी… आमदार श्री तानाजीराव मुटकुळे
पंचांची भुमिका न्यायाधीशासारखी – आमदार श्री तानाजीराव मुटकुळे
वसमत/प्रतिनिधी – महाराष्ट्र खो खो असोसिएशन व हिंगोली जिल्हा ॲम्युचर खो खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2024-25 यावर्षी चे राज्यस्तरीय खो खो पंच शिबिर दि. 27 व 28 जुलै 2024 रोजी, मयूर मंगल कार्यालय, वसमत जि. हिंगोली येथे आयोजित करण्यात आले आहे.
प्रत्येक खेळातील पंचांची भुमिका ही न्यायाधीशासारखी असते. खेळाडू कोणत्या संघाचा आहे, तो कुणाचा जवळचा आहे हे न पाहता योग्य तो निर्णय पंचांनी घ्यायला हवा. पंचांसाठी खेळ आणि खेळाडू महत्त्वाचे असतात असे मनोगत आमदार श्री तानाजीराव मुटकुळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. आज राज्यस्तरीय खो खो पंच शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
दोन दिवस चालणाऱ्या पंच शिबिराचे उद्घाटन हिंगोली विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. तानाजी मुटकुळे यांच्या अध्यक्षतेखाली, वसमत विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. राजूभैया नवघरे यांच्या शुभहस्ते आणि महाराष्ट्र खो खो असोसिएशन चे सरचिटणीस प्रा.डॉ. श्री. चंद्रजित जाधव, कार्याध्यक्ष श्री. सचिन गोडबोले, हिंगोली जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. राजेश्वर मारावार, वसमत नगरपरिषद उपाध्यक्ष श्री. सिताराम म्यानेवार, माऊली पतसंस्था वसमत अध्यक्ष श्री. बाळासाहेब कोसलगे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्री तानाजी बेंडे, वसमत माजी नगराध्यक्ष भगवान कुदाळे, मा.नगरसेवक विष्णू बोचकरी, मा. नगरसेवक शिवाजी अडलिंगे, श्री. गोविंद शर्मा, श्री. प्रशांत इनामदार, श्री पवन पाटील, श्री अविनाश सोनवणे, सौ वर्षा कच्छवा, श्री. संदीप तावडे, श्री प्रशांत पाटणकर, श्री नरेंद्र कुवर, श्री नानासाहेब झांबरे या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितत मोठ्या उत्साहात पार पडले.
या राज्यस्तरीय खो खो पंच शिबिरासाठी राज्यातील 24 जिल्ह्यातील जवळपास 300 पंच व राज्य खो खो संघटनेचे पदाधिकारी उपस्थित झाले आहेत.
उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्तविक हिंगोली जिल्हा ॲम्युचर खो खो संघटनेचे अध्यक्ष श्री. शिवदासजी बोड्डेवार यांनी केले. महाराष्ट्र खो खो संघटनेचे सरचिटणीस प्रा.डॉ.श्री. चंद्रजित जाधव सर यांनी उद्घाटनीय समारंभात मार्गदर्शन करताना खो खो पंचाना खो खो खेळात नवनवीन झालेल्या बदलानुसार स्वतःमध्ये बदल करून घ्यावेत व खो खो खेळाला आणखी पुढे नेण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले. कार्यक्रमाचे उद्घाटक आ.श्री. राजूभैया नवघरे यांनी खो खो पंचाना मार्गदर्शन करताना खो खो सारखे मैदानी खेळ का आवश्यक आहेत, खेळामध्ये सर्वांचा सहभाग कसा वाढेल याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा डॉ अनिल मुगुटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन हिंगोली जिल्हा सचिव प्रा डॉ नागनाथ गजमल यांनी केले.
सदर राज्यस्तरीय खो खो पंच शिबिर यशस्वी करण्यासाठी जिल्हा खो खो संघटनेचे अध्यक्ष तथा शिवेश्वर नागरी सहकारी बँक वसमतचे अध्यक्ष श्री शिवदास बोड्डेवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा खो खो संघटनेच्या उपाध्यक्षा मनीषा काटकर, उपाध्यक्ष प्रशांत सोनी, महाराष्ट्र खो खो असोसिएशन तांत्रिक समितीचे अध्यक्ष तथा हिंगोली जिल्हा ॲम्युचर खो खो असोसिएशन चे सचिव प्रा.डॉ.श्री. नागनाथ गजमल सर, शिवाजी कट्टेकर, अमोल मुटकुळे, मिनानाथ गोमचाळे, बालासाहेब कोसलगे, प्रवीण शेळके, नाना शिंदे, सुरज शिंदे, चिरंजीवी कट्टा, मनोज टेकाळे हे प्रयत्न करत आहेत. कार्यक्रमासाठी खो खो खेळाचे पंच, मार्गदर्शक, प्रशिक्षक, पदाधिकारी, खेळाडू, पत्रकार व क्रीडाप्रेमी नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.