न्यायालयामध्ये तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकल्यामुळे न्यायालयाने लावला दंड
न्यायालयामध्ये तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकल्यामुळे न्यायालयाने लावला दंड
मानवत तालुका प्रतिनिधी – न्यायालयाच्या परिसरात तंबाखुजन्य पदार्थ खाऊन थुंकी केल्याचा प्रकार समोर दिसताच मानवत न्यायालयाचे न्यायाधीशांनी तात्काळ त्या व्यक्तिविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करीत त्याच्यावर तात्काळ १०० रुपयांचा दंड मंगळवारी ता २५ ठोठावला .
मानवत येथील मुख्य न्यायाधीश जी ए करजगार यांच्या न्यायालयामध्ये प्रकरणानिमित्त एक व्यक्ती न्यायालयामध्ये आला होता. जेव्हा त्याला न्यायालयासमोर बोलावले गेले तेव्हा न्यायालयाच्या असे लक्षात आले की तो व्यक्ती काहीतरी तंबाखूजन्य पदार्थ खात आहे लगेच न्यायाधीश महोदय यांनी त्याला त्याबद्दल विचारणा केली असता त्यांनी तंबाखूजन्य पदार्थ खाल्ल्याची कबुली दिली तसेच परिसरामध्ये थुंकल्याचेही सांगितले. सदर कृत्याचे गांभीर्य लक्षात घेता तसेच आरोपीने दिलेल्या कबुलीमुळे न्यायालयाने लगेच त्याच्या विरोधामध्ये अदखलपात्र गुन्हा नोंद करून त्याला शंभर रुपये चा दंड लावला आणि भविष्यामध्ये शासकीय कार्यालयामध्ये तंबाखूजन्य पदार्थ खाऊन घाण करू नये अशी ताकीद दिली.