नांदेड जिल्ह्यात ड्रॅगन बोट राष्ट्रीय स्पर्धा उत्साहात संपन्न; खेळाडूंचा मोठा प्रतिसाद

नांदेड जिल्ह्यात ड्रॅगन बोट राष्ट्रीय स्पर्धा उत्साहात संपन्न; खेळाडूंचा मोठा प्रतिसाद
कंधार प्रतिनिधी : गोविंद महाजन बारुळ (ता. कंदार, जि. नांदेड) येथे आयोजित १२वी नॅशनल ड्रॅगन बोट सिनियर, U/23 आणि ज्युनियर (पुरुष व महिला) चॅम्पियनशिप २०२५–२०२६ तसेच ३री पॅरा ड्रॅगन बोट चॅम्पियनशिप २५ ते २७ नोव्हेंबरदरम्यान उत्साहात पार पडली. निम्न मनार प्रकल्प, बारुळ येथे आयोजित या जलक्रीडा स्पर्धेला देशभरातील खेळाडूंनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.
तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत विविध राज्यांमधून आलेल्या संघांनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील अनेक तरुण खेळाडूंनीही मोठ्या संख्येने सहभाग घेत उत्कृष्ट कामगिरी केली. जलक्रीडा क्षेत्रात गावागावातून मिळालेला हा प्रतिसाद उल्लेखनीय ठरला.
स्पर्धेसाठी परिसरात स्वागताचे फलक लावण्यात आले होते. त्यामध्ये महाराष्ट्रन ड्रॅगन बोट अँड ट्रेडिशनल वॉटर स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे सचिव दिनेश मुंडे आणि अध्यक्ष टॉम जोसेफ यांनी सर्व खेळाडू, प्रशिक्षक, अधिकारी आणि मान्यवरांचे स्वागत केले.
राष्ट्रीय स्तरावरील या तीन दिवसीय स्पर्धेच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्याला जलक्रीडा क्षेत्रात नवी ओळख मिळाली असून भविष्यात अशा स्पर्धांना आणखी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.












































