डॉक्टर ज्योती ढंमढेरे यांचा सामाजिक उपक्रम
डॉक्टर ज्योती ढंमढेरे यांचा सामाजिक उपक्रम
मानवत सौ ममता चिद्रवार
येथील ज्येष्ठा दंतवैद्या डॉक्टर ज्योती ढंमढेरे यानी गत पंधरवडय़ात तीन सामाजिक उपक्रम राबविले.
सर्वप्रथम सौ.लता गणेशराव भरड संचालित सरस्वती शिशुवाटिकेत बालकांची दाताची तपासणी करून सुमारे 30 बालकांना टुथब्रशवाटप केले.तसेच याप्रसंगी उपस्थित मातापालकानाही मुलाच्या दाताच्या आरोग्याबद्दल मार्गदर्शन केले.
त्यानंतर सौ.लता भरड सरस्वती शिशुवाटिकेतील बालकांना डॉक्टर ज्योती ढंमढेरे यान्च्या दवाखान्यात भेट देण्यास आणले. त्यावेळीच माहिती व टूथपेस्टचे बालकांना डॉक्टर ज्योती ढंमढेरे यानी मोफत वाटप केले.
तसेच पान्डे गल्लीतील सौ.वंदना कुमावत संचालित माऊली सेमी इन्ग्लिश स्कूल येथेही दिनांक 8/8/24 शुक्रवारी डॉक्टर ज्योती ढंमढेरे यानी दाताच्या आरोग्याबद्दल बालकांना व मातापालकाना मार्गदर्शन केले.तसेच 20 बालकांना मोफत डेन्टल फ्लास वाटप केले.