जिजाऊ ब्रिगेड भोकर तालुका अध्यक्षपदी सविता कोकाटे
जिजाऊ ब्रिगेड भोकर तालुका अध्यक्षपदी सविता कोकाटे
***********
भोकर (तालुका प्रतिनिधी)
मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडच्या भोकर तालुका अध्यक्षपदी शिवमती सविता गंगाधर कोकाटे यांचे निवड करण्यात आली.
28 सप्टेंबर रोजी मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड भोकर तालुक्याची कार्यकारिणी घोषित करण्यात आली. या कार्यक्रमासाठी जिल्हाध्यक्षा, शिवमती कल्पनाताई चव्हाण , सुमित्राताई वडजकर , सचिव अर्चनाताई होगे कार्याध्यक्षा सुनिताताई कल्याणकर उपस्थित होत्या.
भोकर तालुकाध्यक्षापदी शिवमती सविता गंगाधर कोकाटे (मांजरेकर ) यांची नियुक्ती जिल्हाध्यक्षा मार्फत करण्यात आली होती . हेच तालुकाध्यक्षा पद या कार्यक्रमात सविता कोकाटे यांना देऊन पुनर्गठित करण्यात आले शिवमती जमुना जाधव (उपाध्यक्षा), शोभा कुमरे (सचिव ), सुषमा पोमनाळकर ( सहसचिव), डॉ.मनिषा माने (कार्याध्यक्षा ), निर्मलाताई किन्हाळकर (कोषाध्यक्षा ), शुभदा जाधव ( संघटक), सुचिता सोळंके (संघटक), जयश्री सोळंके (सल्लागार ), समिधा माने (सल्लागार ) आदींची निवड करण्यात आली5 सप्टेंबर रोजी जिजाऊ ब्रिग्रेड मार्फत मुक्ता साळवे यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचे बक्षिस वितरणही या कार्यक्रमात करण्यात आले.. जिल्हाध्यक्षा कल्पनाताई चव्हाण आणि सुमित्राताई वडजकर यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले . सूत्रसंचालन जमुना जाधव यांनी केले यशस्वीतेसाठी डॉ. पंजाब चव्हाण , प्रा. होगे , जाधव ( लामकाणीकर ), गंगाधर कोकाटे, विठ्ठल कुमरे यांनी सहकार्य केले .