गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शिष्यवृत्ती वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न…..
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शिष्यवृत्ती वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न…..
वसमत…… प्रतिनिधी….. येथील आर्य वैश्य समाज बांधवां तर्फे दरवर्षी कोजागिरी पौर्णिमा उत्साहात साजरी केली जाते. यावर्षी देखील कोजागिरी पौर्णिमा सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत विविध गेम, कपल गेम, लहान मुलांसाठी गेम, गरबा व दांडिया खेळाचा आनंद घेत मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. श्री वासवी भवन मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्थानिक स्नेहमिलन कार्यक्रमासाठी आर्य वैश्य समाजातील महिला, पुरुष, लहान मुले यांच्या सह जेष्ठ नागरिकांनी कार्यक्रमात सहभागी होऊन आनंद साजरा केला. मागील शैक्षणिक वर्षांत दहावी, बारावी, इंजिनिअरिंग व ईतर स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा यावेळी मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला. समाज बांधवां तर्फे घोषित शिष्यवृत्तीचे यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. तसेच विविध गेममध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या महिला भगिनी व लहान मुले यांनाही विशेष भेटवस्तू देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. श्री वासवी माता कन्यका परमेश्वरीची पुजा आरती करुन, महाप्रसाद व शर्करायुक्त दुग्धसेवनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. स्थानिक आर्य वैश्य कार्यकारिणी पदाधिकारी व समाज बांधवां तर्फे सदरील कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले.