खरीप हंगामात अंतर मशागत तंत्रज्ञान महत्वाचे – डॉ.अशोक ढगे
खरीप हंगामात अंतर मशागत तंत्रज्ञान महत्वाचे–डॉ.अशोक ढगे
नेवासा प्रतिनिधी-यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीला पाऊस चांगला झाल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन, कपाशी, उडीद, तुर, बाजरी यासारखी पिके पेरली आहेत.आता जुलै महिन्यामध्ये पावसाच्या सरी अधून मधून येत आहे.त्यामुळे पिकांची वाढ सुद्धा चांगली आहे.शेतकऱ्यांनी आता अंतर मशागत तंत्रज्ञान याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.अंतर मशागत तंत्रज्ञानामध्ये खुरपणी पाणी व्यवस्थापन रासायनिक खतांचा वापर तसेच कीड व रोगांच्या बंदोबस्तासाठी योग्य औषधाची फवारणी करणे आवश्यक आहे.तन नाशकांच्या फवारणी पेक्षा खुरपणी अधिक फायदेशीर ठरते.पाण्याचे व्यवस्थापनाबाबत संरक्षित पाणी देणे किंवा ज्या ठिकाणी जास्त पाणी साचले असेल ते शेतामधून बाहेर काढणे हे महत्त्वाचे आहे.रासायनिक खतांचा लागवडीचा डोस दिल्यानंतर तीस दिवसांनी युरिया हप्ता द्यावा ढगाळ हवामानामुळे कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होत असतो त्यासाठी पाच टक्के निंबोळी अर्क ची फवारणी करावी असा कृषी सल्ला कृषी शास्त्रज्ञ डॉ.अशोक ढगे यांनी दिला आहे.