ओबीसी आरक्षणासंदर्भात शासनाची सकारात्मक भूमिका:
ओबीसी आरक्षणासंदर्भात शासनाची सकारात्मक भूमिका:
भोकर तहसील कार्यालयासमोर सुरू असलेले उपोषण मागे
**************
भोकर (तालुका प्रतिनिधी)
जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे ओबीसी आरक्षण बचाव या मागणीसाठी प्रा.लक्ष्मणराव हाके, नवनाथ वाघमारे यांनी सुरू केलेल्या उपोषणास महाराष्ट्रातून उस्फूर्त पाठिंबा मिळाला सरकारने या संदर्भात सकारात्मक आश्वासन दिल्याने उपोषण सोडण्यात आले भोकर येथे सुरू असलेले उपोषण सुद्धा, 22 जून रोजी मागे घेण्यात आले.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, सगेसोयरे संदर्भातील जीआर काढू नये यासह अन्य मागण्यासाठी जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे प्रा.लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांनी आमरण उपोषण सुरू केले या उपोषणाला महाराष्ट्रभरातून उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला जागोजागी उपोषणे सुरू करण्यात आली याबाबतीत शासनाने दखल घेऊन ओबीसी शिष्ट मंडळाला आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले भोकर येथे तहसील कार्यालयासमोर संजय दिगंबर गौड आलेवार यांनी चितेवर बसून 20 जून पासून आमरण उपोषण सुरू केले होते हे आगळे वेगळे उपोषण असल्याने जिल्हाभरातून मान्यवर मंडळींनी या ठिकाणी भेटी दिल्या शासन स्तरावर या उपोषणाची सुद्धा दखल घेण्यात आली याच उपोषणाला पाठिंबा म्हणून रेनापुर येथील युवक नागोराव बिरगाळे यांनीही आमरण उपोषण सुरू केले होते 22 जून रोजी प्रा.लक्ष्मण हाके यांनी उपोषण मागे घेतल्यामुळे भोकर येथील उपोषणही मागे घेण्या रामेश्वर जी गौड महाराज त आले तहसील कार्यालयाचे प्रतिनिधी यावेळी हजर होते पोलीस निरीक्षक सुभाष चंद्र मार क यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना शरबत देऊन उपोषण सोडण्यात आले यावेळी बहुजन नेते नागनाथराव घीसेवाड, नागोरावजी शेंडगे, बी.आर .पांचाळ, साहेबराव भोंबे, रामेश्वरजी गौड, निळकंठ वर्षेवार मनोगत व्यक्त करून ओबीसी समाज बांधवांच्या एकजुटीचा विजय झाला, न्याय हक्काच्या मागण्यासाठी ओबीसींना संघर्ष करावा लागत आहे आता ही चळवळ मोठ्या संख्येने पुढे नेऊन आपल्या हक्कासाठी सर्वांनी जागे राहिले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी पत्रकार उत्तम बाबळे, अनिल डोईफोडे, रमेश महागावकर, व्यंकट वाडेकर यांच्यासह ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते