आर्द्रा नक्षत्राच्या समाधानकारक पावसाने बळीराजा आनंदला: खरिपांच्या सर्व दूर पेरण्या उरकल्या

आर्द्रा नक्षत्राच्या समाधानकारक पावसाने बळीराजा आनंदला: खरिपांच्या सर्व दूर पेरण्या उरकल्या
***************
भोकर( तालुका वार्तापत्र- बी. आर. पांचाळ ) चालू वर्षी बिगर मोसमी पावसाने लवकरच सुरुवात केली जून महिन्यामध्ये देखील बऱ्यापैकी पाऊस पडला होता शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या.त्यानंतर पंधरा दिवस पावसाने दडी मारली होती, त्यामुळे बळीराजा चिंतातूर झाला होता, मृग नक्षत्र कोरडेच गेले होते मात्र आर्द्रा नक्षत्र बरसल्याने शेतकरी समाधानी झाला असून सर्व दूर खरिपाच्या पेरण्या उरकल्या आहेत.
चालू वर्षी मे महिन्यातच बिगर मोसमी पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला विजांचा कडकडाट वादळी वारे यासह मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने नदी नाल्यांना पुरही आले होते शेतकऱ्यांची मशागतीची कामे राहून गेली होती मधेच काही दिवस पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी आपली कामे आटोपून घेतली जून महिन्यामध्ये हे साधारण पाऊस झाल्याने खरिपाच्या पेरण्या उरकल्या मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली शेतकरी चिंता दूर झाला होता सर्वांचे डोळे आकाशाकडे लागले होते प्रचंड प्रमाणात उकडा जाणवत होता ऊन देखील लागत होते यामुळे सर्वांनाच पावसाची चिंता लागली होती कधी पाऊस पडेल याचीच वाट शेतकरी बघत होते काही उर्वरित पेरण्या देखील खोळंबल्या होत्या मृग नक्षत्रात पाऊस झालाच नाही.
:आर्द्रा बरसल्या बळीराजा आनंदला
***************
मृग नक्षत्रामध्ये पूर्ण पेरण्या आटोपल्या होत्या मात्र पाऊस झाला नसल्याने बियाणांची उगवण झालीच नाही काही बियाणे वर आले मात्र पाऊस नसल्याने कोमेजून जात होते आर्द्रा नक्षत्रात 25 जून रोजी भोकर तालुक्यात चांगल्या प्रकारे समाधानकारक पाऊस झाल्याने खरिपांच्या पेरण्या साधल्या बियाणांची चांगल्या प्रकारे उगवण झाली त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद झाला रात्रभर रिमझिम पाऊस चालूच होता त्यामुळे खरिपांच्या प्रेरणा समाधानकारक झाल्या. तालुक्यातील जवळपास 90 टक्के पेरण्या उरकले आहेत सोयाबीन कापूस तूर मूग उडीद ज्वारी अशा सर्व वाणांची पेरणी करण्यात आली
भोकर तालुक्यात 128 मिलिमीटर पावसाची नोंद
***************
मृग नक्षत्र कोरडेच गेले मृग नक्षत्रात पाऊस झाला नाही आरद्रा नक्षत्र निघाल्यानंतर समाधानकारक पाऊस झाला आणि खरिपाच्या पेरण्या साधल्या भोकर मंडळात 123 मिलिमीटर पाऊस मोगली मंडळात १३७ मिलिमीटर पाऊस मात्र मंडळात 154 मिलिमीटर पाऊस किनी मंडळात 99 मिलिमीटर पाऊस झाला तालुक्यात एकूण 128 मिलिमीटर सरासरी पाऊस झाला शेतकऱ्यांनी पेरण्या करून घ्याव्यात पाच इंचापर्यंत जमिनीत ओल असावी बियाणांची उगवण क्षमता तपासून घ्यावी असे आवाहन तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी केले आहे
शालेय साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी
***************
बियाणे खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी 15 दिवसांपूर्वी उसळली होती रासायनिक खते काही प्रमाणात मिळाले नाहीत काही बियाणांची देखील कमतरता जाणवली खरिपांच्या पेरण्या आटोपल्यानंतर शाळा सुरू झाल्या आणि बाजारात वह्या पुस्तके पेन इतर साहित्य दप्तर छत्री असे साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी सुरू झाली चालू वर्षी शालेय साहित्याचे भाव वाढल्याने पालक वर्ग चिंता दूर झाला आहे विद्यार्थ्यांना सर्व साहित्य घेऊन देणे आणि पेरणीचा मोसम यामुळे मोठे संकट शेतकऱ्यांना देखील आलेले होते अशाही परिस्थितीत सर्व अडचणीवर मात करून शेतकऱ्यांना शेतातील पेरणी आणि विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणे असे दुहेरी काम एकाच वेळी आल्याने आर्थिक अडचण निर्माण झाली.