जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नांदुसा येथे शाळा प्रवेश महोत्सव उत्साहात साजरा.

नांदेड प्रतिनिधी – जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नांदुसा येथे शाळा प्रवेश महोत्सव उत्साहात साजरा.
जिल्हा परिषद नांदेड चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा. राठोड साहेब, मा.राहुल लोंढे साहेब व तरोडा ब. चे कार्यतत्पर केंद्र प्रमुख धोंडगे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदुसा येथे शाळा प्रवेश महोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला.
नवीन प्रवेश घेतलेल्या बालकांना पाठ्यपुस्तकासोबत वही व पेन्सिल चे वाटप आ.राठोड साहेब यांच्या मार्फत करण्यात आले.स्वागत दिंडी हा वेगळेपण नांदुसा प्रशालेत घेण्यात आला. मान्यवरांनी नविन विद्यार्थ्यांना शुभेच्छा व शुभाशीर्वाद दिले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक यांचे वाटप मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक पऊळ सरांनी मान्यवरांचे आभार मानले. शाळेतील सर्व शिक्षक शालेय व्यवस्थापन समिती चे सर्व सदस्य अध्यक्ष, पालक यांची उपस्थिती होती.