आपल्यला लोन पाहिजे का ?
Homeआपला महाराष्ट्रसामाजिक कार्य

भोकर विधानसभा मतदारसंघात युवकांची फळी मनसेच्या पाठीशी- साईप्रसाद जटलावार

भोकर विधानसभा मतदारसंघात युवकांची फळी मनसेच्या पाठीशी- साईप्रसाद जटलावार
****************

भोकर (प्रतिनिधी)
भोकर विधानसभा मतदारसंघातील जनता नेहमी त्याच उमेदवारांना कंटाळली असून नवीन उमेदवारांनी केलेले प्रतिनिधित्व मतदारांना भावत आहे या मतदारसंघातील युवक मनसेच्या विचारांच्या पाठीशी उभे टाकले असून ग्रामीण भागात व शहरात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार साईप्रसाद जटलावार यांनी केले आहे
भोकर विधानसभा मतदारसंघात मागील अनेक वर्षांपासून राजकीय पटलावर दिग्गज नेते मंडळींनी “राज” केल.जनतेच्या मूलभूत गरजांकडे कानाडोळा करून स्वहित साधल आहे. अशा वृत्तीला जनता कंटाळली असून पर्याय म्हणून भक्कमपणे मनसेच्या पाठीशी आहे असे मनसेचे अधिकृत उमेदवार साई जटालवार यांनी म्हटले आहे.
येथील मतदार संघावर राजकारणातील बड्या हस्तीने ताबा मिळवला आहे.ती त्याची पंरपरागत राजकीय भूमी असल्याचे दाखवून मतदारांना झूलवत ठेवले आहे.चेलेचपाट्यांना गब्बर केल असुन मतदारांना विकासाच गांजर देत आपली पोळी भाजून घेतली आहे.राजकारणातील ऊच्चपदाची माळ गळ्यात घातली असली तरी येथील परिसराच्या मुलभुत सूवीधाकडे अद्याप लक्ष दिले नाही.घराणेशाहि राबवून इतर पदाधिकाऱ्यांना केवळ वापरून घेतलं जातं. अशा कटकारस्थानाला जनता कंटाळली आहे.राज्याच्या विकासाचा आराखडा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी तयार केला.त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मतदारांनी मनसेच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन श्री.जटालवार यांनी केले आहे. यावेळी संतोष पाटिल मनमंदे, संदिप गायकवाड, दत्ता शिरळकर, सुशिल बिच्छेवार, मारोती जंगमवाड, महंमद मुखीरोद्दीन, बालाजी बालाजी बर्गेवाड यांची उपस्थिती होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button