सेलु च्या उपोषणास मानवत येथील मुस्लिम बांधवांचा पाठिंबा
सेलु च्या उपोषणास मानवत येथील मुस्लिम बांधवांचा पाठिंबा
सेलू येथे सामाजिक कार्यकर्ते अँड .विष्णू ढोले हे मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी दि. ४ जुलै रोजी पासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे आमरण उपोषणास बसले आहे.. त्यांच्या आमरण उपोषणास मानवत येथील मुस्लिम समाज बांधवांचा दिनांक ८जुलै रोजी माननीय तहसीलदार यांना निवेदन देऊन त्या उपोषणास पाठिंबा दर्शविला आहे…
व सदरील मागण्या मान्य न केल्यास मानवत शहरातही आंदोलन करण्यात येईल याची दखल घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे..
त्यांचे प्रमुख मागण्या खालील प्रमाणे आहे…
मुस्लिम समाजाला सर्वोच्च क्षेत्रामध्ये १० टक्के आरक्षण देण्यात यावे, मुस्लिम समाजाला पूर्ण आरक्षण मिळेपर्यंत अंतिमरीत्या जुलै २०१४ मध्ये तात्कालीन आघाडी शासनाने अध्यादेशद्वारे मुस्लिम समाजाला दिलेल्या ५ टक्के आरक्षण ची शैक्षणिक क्षेत्रात माननीय उच्च न्यायालयाने मान्य केले होते ते आरक्षण पूर्ण स्थापित करण्यात यावे, महाज्योती सारथी बाटिच्या धरतीवर मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांसाठी माट्टिची (मौलाना आझाद रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट) या स्वायत संस्थेची स्थापना करण्यात यावी, मुस्लिम समाजाला आरक्षण मिळेपर्यंत या समाजातील विद्यार्थ्यांना उच्च व तंत्र शिक्षण तसेच वैद्यकीय व इतर व्यवसायिक शिक्षणासाठी शैक्षणिक फी मध्ये पाच टक्के सवलत अर्थात शिष्यवृत्ती योजना सुरू करावी, मागासवर्गीय सहकारी संस्थेच्या धर्तीवर अल्पसंख्यांक सरकारी संस्था स्थापन व नोंदणीसाठी कायदा करण्यात यावा,
प्रत्येक तालुक्याचे ठिकाणी उर्दू धर्म मुस्लिम समाजासाठी संस्कृतिक सभागृह उभारण्यात यावे, न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा आयोग सच्चर समिती महेमुद-उर्र- रहेमान समिती या तिन्ही समितीने मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या सर्व शिफारशीची अंमलबजावणी करण्यात यावी अशाप्रकारे या निवेदनामध्ये नमूद आहे…. या निवेदनावर आसद खॉन, मुसा कुरेशी,शेख रहेमत, नजीर विटेकर,मुकंदर खान,वाजेद शेख, मोसिन अन्सारी, मेहबूब मन्सुरी,खयूम साहारा, सय्यद सईद, शेख जुबेर, सय्यद समीर, , शेख सईद, इलियास पठाण,वसिम कुरेशी,रेहान भडके, सुलतान मन्सुरी,इत्यादींचे स्वाक्षरी आहेत…..