सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
आपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताशालेय शिक्षण व क्रीडा

सुचित दांगटे यांची नवोदय परीक्षेत यशस्वी घोडदौड

सुचित दांगटे यांची नवोदय परीक्षेत यशस्वी घोडदौड

लोहा प्रतिनिधी: पारडी येथील सह्याद्री प्राथमिक ते उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी सुचित मारोती दांगटे यांची प्रतिष्ठित जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत निवड झाली आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण शाळा आणि गावात आनंदाचे वातावरण आहे.

सुचितच्या या यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे संचालक सुदर्शन शिंदे, संचालिका जयश्री शिंदे, मुख्याध्यापक साईकुमार दहिवाळ, सह्याद्री पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक अनिल जाधव, प्री-प्रायमरीच्या मुख्याध्यापिका रुक्मिणी धोंडगे तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

सुचितच्या या उज्ज्वल यशामागे त्याच्या कठोर परिश्रमासोबतच शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले. भविष्यात त्याने आणखी मोठे यश संपादन करावे, अशी सर्वांकडून त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button