सारथीच्या शिबिरात ७८ जणांचे रक्तदान, ४०० विद्यार्थ्यांना गणवेश वाटप
सारथीच्या शिबिरात ७८ जणांचे रक्तदान, ४०० विद्यार्थ्यांना गणवेश वाटप
मानवत तालुका प्रतिनिधी
सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या येथील सारथी फाऊंडेशनच्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने गुरुवारी ता १५ घेण्यात आलेल्या शिबिरात ७८ जणांनी रक्तदान केले तसेच विविध शाळातील ४०० गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले .
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर झालेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन महामंडलेश्वर मनिषानंद पुरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात एकूण ७८ दात्यांनी रक्तदान केले . रक्तसंकलन परभणी जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेडीचे डॉ कृष्णा अबुज, अनिल सावंत, आसाराम गीते, विकास कांबळे, अभिषेक डोंबे, सौरभ भिसे, किरण कदम, विद्यानंद शिंदे यांनी केले .
सारथी फाऊंडेशनच्या वतीने शहरातील श्रीमती शकुंतलाबाई कांचनराव कत्रुवार विद्यालय , नेताजी सुभाष विद्यालय व भाले पाटील विद्यालयातील गरजू ४०० विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सारथी फाऊंडेशनच्या सर्व सदस्यांनी प्रयत्न केले .