सलग चार दिवस सुट्टीची पर्वणी…
सलग चार दिवस सुट्टीची पर्वणी….
वसमत प्रतिनिधी : हिंगोली जिल्ह्यात ईद-ए-मिलाद सणाची सोमवारी (ता. १६) सुटी कायम असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिले आहेत.
ईद-ए-मिलाद च्या सोमवारी कायम केलेल्या सुट्टीमुळे दुसरा शनिवार, रविवार, सोमवार व मंगळवारी हैदराबाद मुक्ती संग्राम दिन असे सलग चार दिवस शासकीय कर्मचारी, शाळा, व इतर आस्थापना यांना सुट्टी मिळाली आहे. त्यामुळे पर्यटनाचे बेत आखले जात आहेत.
राज्यात ईद-ए-मिलाद सणानिमित्त सोमवारी जाहीर केलेली सुटी कायम ठेवावी अथवा रद्द करावी. त्या बदल्यात १८ रोजी सुटी जाहीर करावी किंवा स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा, अशी अधिसूचना शासनाने काढली होती. या अनुषंगाने जिल्हाधिकारी गोयल यांनी पोलिस विभागाकडून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यांमध्ये मुख्यालयाच्या ठिकाणी २२ सप्टेंबर रोजी व इतरत्र १८ सप्टेंबर रोजी किंवा वेगळ्या तारखेस सण साजरा केला जात असल्यामुळे जिल्ह्यात सोमवारी असलेली सुटी कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात ईद-ए-मिलाद सणाची सोमवारी (ता. १६) सुटी कायम असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिले आहेत.