संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान….!
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातील
***********
हाडोळी गावाला मिळाला राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार
***********
भोकर (तालुका प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे हाडोळी गावाने गावाची संघटन शक्ती एकत्रित करून गाव सर्वांनी मिळून स्वच्छ केले, सुंदर बनविले शासनाने ठरविल्या निकषांमध्ये गाव आल्याने गावाला संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातील राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळाला 23 सप्टेंबर 2024 रोजी छ. संभाजीनगर येथे पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
भोकर तालुक्यातील हाडोळी गावाने पूर्वीपासूनच गावाची स्वच्छता जपली आहे, हागणदारी मुक्त गावासाठी जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार गावाला मिळाला होता त्यानंतर पाणी फाउंडेशनचे देखील प्रथम बक्षीस गावाला मिळाले, स्मार्ट व्हिलेज मध्ये देखील गावाने प्रथम क्रमांक मिळविला, गावातील रस्ते सुंदर झाले, नाल्यांची सफाई झाली, शाळा, अंगणवाडी सजली, वृक्षारोपण गावात मोठ्या प्रमाणावर झाले विद्यार्थ्यांसाठी ओपन जिम तयार करण्यात आली, स्वच्छ पाण्याचा पुरवठा गावाला आहे, प्रत्येक घरावर मुलीच्या नावाची पाटी आहे, घराघरावर रंगरंगोटी करण्यात आली आहे विशेष म्हणजे गावातील महिला युवक व सर्व समाजातील लोक एकत्रित येऊन ग्रामस्वच्छता अभियानात श्रमदानाने काम करून गाव सुंदर बनविले आहे.
राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार
***********
गावाने संघटित होऊन स्वच्छतेचा मंत्र हाती घेतला सर्वांनी मिळून गावासाठी एकच ध्यास घेतल्यामुळे गाव अतिशय सुंदर बनले महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातील 2020- 2021 व 2021- 2022 चा पुरस्कार एकत्रितरीत्या देण्यात आला अल्पसंख्यांक विकास मंत्री अब्दुल सत्तार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते हाडोळीच्या सरपंच अनिता माधवराव अमृतवाड, माधवराव अमृतवाड व ग्रामस्थ यांना प्रदान करण्यात आला मंत्रालयाचे अवर सचिव राजेंद्र खंदारे, उपायुक्त वेदमुथा, लाहोटी, अवर सचिव चंद्रकांत मोरे पाणीपुरवठा विभागाचे बाळासाहेब हजारे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, विपिन इटनकर, वर्षा ठाकूर, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे, अमित राठोड, स्वच्छता अधिकारी नारायण मिसाळ, मिलिंद व्यवहारे या सर्वांचे मार्गदर्शन गावाला मिळाले होते या पुरस्काराबद्दल हाडोळी गावाचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे