Homeआपला महाराष्ट्रसरकारी योजनासामाजिक कार्य
संजय गांधी अनुदान योजना समितीवर अमोल कदम , कविता धबडगे यांची नियुक्ती
संजय गांधी अनुदान योजना समितीवर अमोल कदम, कविता धबडगे यांची नियुक्ती
मानवत प्रतिनिधी
मानवत तालुका संजय गांधी अनुदान योजना समितीच्या अध्यक्षपदी रामेटाकळी येथील अमोल कदम तर सदस्यपदी कविता धबडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे .
परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचे शिफारशीवरून जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सदरील नियुक्त्या केल्या असून उर्वरित सदस्यात मानवतचे नागनाथ कुऱ्हाडे, किशोर चव्हाण, मीरा काळे सावळी, निलेश यादव रामपुरी, कल्याण देशमुख मंगरूळ बु, शिवाजी वरखडे कुंभारी, व ज्ञानेश्वर भिसे कोल्हा यांचा समावेश आहे .
त्यांच्या या नियुक्तीबद्दल आमदार राजेश विटेकर, युवानेते डॉ अंकुश लाड व बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर यांनी अभिनंदन केले आहे .