शासकीय आय टी आय मानवत च्या ६ प्रशिक्षणार्थीची जलसंपदा विभागात निवड….
शासकीय आय टी आय मानवत च्या ६ प्रशिक्षणार्थीची जलसंपदा विभागात निवड….
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
मानवत तालुका प्रतिनिधी : येथील शासकीय आय टी आय संस्थेतुन आरेखक स्थापत्य ऊत्तीर्ण उमेदवार अनुज संघई ‘ प्रदीप साखरे ‘ अमोल जावळे ‘ संतोष सोळंके ‘ रवी सारडीवाल ‘व ज्ञानेश्वर मुळे यांची छ. संभाजी नगर व नागपुर विभागात शासकीय सेवे साठी अनुरेखक पदावर स्पर्धा परिक्षेतुन निवड झालेली आहे.
त्या बदल त्यांचे पालक व ऊमेदवार यांचे सत्कार चे आयोजन निदेशक स्थापत्य श्री सोनवळकर एम एस यांनी स्थापत्य विभागात करण्यात आले गट निदेशक के.टी . पटेकर ‘ मुख्य लिपिक श्री मुळे ‘ निदेशक आनंदा जगाडे ‘ वल्लमवाड ‘ शिवलींग कुंभार ‘ संजय पवार ‘कीशोर जाधव ‘ बाभूळकर ‘ श्रीमती भोईर ‘ नाटकर मॅडम यांचे ऊपस्थीतीत आई वडील सह त्यांचा गौरव सत्कार रुपी करण्यात आला सध्या प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थी साठी ही बाब अनुकरणीय आहे सर्वांना भावी जीवनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या कंत्राटी सेवा नियमीत झाले बाबत शिवलींग कुंभार यांचाही सत्कार याच कार्यक्रमात करण्यात आला कार्यक्रमाचे संयोजन व आभार प्रदर्शन स्थापत्य निदेशक सोनवळकर एम एस . यांनी केले.