Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्तासरकारी योजना
शहापूर ते गेवराई महामार्गाला तातडीने मंजुरी द्यावी-खासदार भाऊसाहेब वाकचौरे…
शहापूर ते गेवराई महामार्गाला तातडीने मंजुरी द्यावी – खासदार भाऊसाहेब वाकचौरे…
नेवासा प्रतिनिधी– शेवगाव–भेंडा कारखाना –नेवासा –श्रीरामपूर –बाभळेश्वर -लोणी –संगमनेर –अकोला –शेंडी यांना जोडणारा शहापूर येथे NH-८४८ (जुना NH-३)सह जंक्शनवर समाप्त होणारा गेवराई जवळील NH-52 (जुना NH-२११) वर महामार्गास तातडीने मंजुरी द्यावी अशी मागणी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी रस्ते वाहतूक महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शयांची समक्ष भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे केली.सदर निवेदनात त्यांनी NH-52 (जुना) च्या जंक्शन पासून सुरु होणाऱ्या विद्यमान राज्य महामार्गाला (SH50) राष्ट्रीय महामार्ग म्हणून जोडणे बाबत सदर प्रस्तावाची आवश्यकता निदर्शनास आणून दिली.सदर महामार्गामुळे बीड, अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव, नेवासा, श्रीरामपूर, संगमनेर, अकोले या तालुक्यांसह ठाणे जिल्ह्यातील शहापूर जोडले जाणार आहे .
याबाबत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सकारात्मकता दाखवून तातडीने कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिलेत.याबद्दल रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आभार मानले.