विद्यार्थ्यांसाठी कम्प्युटर कोर्सचे आयोजन..
विद्यार्थ्यांसाठी कम्प्युटर कोर्सचे आयोजन..
वसमत प्रतिनिधी.: बहिर्जी स्मारक महाविद्यालय, वसमत जि. हिंगोली येथे ग्रंथालय विभागामार्फत आज दिनांक 21/08/2024 रोजी महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या हस्ते “Basic Computer Course” चे उद्घाटन करण्यात आले.
सर्व विद्यार्थ्यांनी हा कोर्स पूर्ण करून स्वतःचा फायदा करून घ्यावा कारण कुठेही नोकरी करत असताना हे ज्ञान असणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन प्राचार्य मा. मा. जाधव सर यांनी केलें.
ग्रंथपाल व कोर्स समन्वयक डॉ. सविता आवचार मॅडम, म्हणाल्या की, आजच्या काळात कम्प्यूटर साक्षरता महत्त्वाची आहे. या कोर्स मध्ये MS Word, Excel, PowerPoint Presentation, Email करणे. इत्यादी सर्व बेसिक गोष्टी शिकवल्या जाणार आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना कुठेही डाटा एन्ट्री ऑपरेटर, स्टॉक मॅनेजमेंट, फाईल आणि डाटा मॅनेजमेंट , असाईंनमेंट टाईप करणे सर्व सहज करता येईल जॉब मिळवणे शक्य होईल.
तसेच त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना आवाहन केले की, आज 30 विद्यार्थी सहभागी झाले आहेत. असाच प्रतिसाद मिळाला तर, अजून दुसरी बॅच सुरू केली जाईल. तरी महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रंथालय विभागामार्फत करण्यात आले आहे.