वाढवणा बु केंद्रीय प्रा.शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीअध्यक्षपदी वार्ताहर हुकूमत शेख यांची निवड
वाढवणा बु केंद्रीय प्रा.शाळेच्या शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी वार्ताहर हुकूमत शेख यांची निवड
देमगुंडे जयराम : उदगीर तालुक्यातील वाढवणा बु येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत नुकतीच दि. २०ऑगष्ट २०२४ मंगळवार रोजी पालक मेळावा बोलावून इच्छुक पालकांची सर्वानुमते १५ सदस्यांची शालेय व्यवस्थापन समिती बनवण्यात आली एम.ए.बी.पी.एड, बी.जे. पदवी प्राप्त उच्चशिक्षित असलेले जेष्ठ वार्ताहर हुकूमत शेख यांची के. प्रा. शाळेच्या शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष पदी रशीद धावडे यांची निवड करण्यात आली या निवडी बद्दल मु.अ.डी.पी.वाकळे,शिक्षक डोईजोडे संजय, राम देमगुंडे प्रमुख पाहुणे जाकीर तांबोळी, सदस्य रशीद खुरेशी,रफिक हवलदार, महंमद शेख,विनोद जाधव,इस्माईल सगु, श्रीहरी नागपूर्णे, नेहा धावडे,मोमीन इरफत, खुरेशी बिस्मिल्ला, नालटे कविता, माजीद पठाण, आदि इष्ट मित्र परिवार सदस्या तर्फे नुतन अध्यक्ष हुकूमत शेख उपाध्यक्ष रशीद धावडे यांचे अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या