सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रसरकारी योजनासामाजिक कार्य

वाचन व लेखन कौशल्य विकासासाठी वर्तमानपत्राचा उपयुक्त उपक्रम

वाचन व लेखन कौशल्य विकासासाठी वर्तमानपत्राचा उपयुक्त उपक्रम

अहमदपूर (प्रतिनिधी): येथील नूतन मराठी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे वाचन व लेखन कौशल्य वाढवण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत दुसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना दररोज सुट्टीच्या वेळेत वर्तमानपत्र वाचून त्यातील दोन बातम्या लिहून आणण्यास सांगण्यात आले.संपूर्ण आठवडा भर राबवण्यात आलेल्या या उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासोबतच लेखनाची सवयही लागली. उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे बक्षीस देऊन व कौतुक करून पोलावर मॅडम यांनी उत्साहवर्धन केले.शाळेच्या मुख्याध्यापिका गायकवाड के. आर. यांनी विद्यार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक करत या उपक्रमाची प्रशंसा केली. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील कुलकर्णी मॅडम, बेंबळे मॅडम, बिरादार मॅडम, देशमुख मॅडम, कोतलापुरे सर, उपरवाड सर आणि पुठ्ठेवाड सर यांनी विशेष परिश्रम घेतले.संस्थेचे अध्यक्ष माननीय आबासाहेब देशमुख व सचिव अक्षय भैय्या देशमुख यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमशीलतेचे अभिनंदन करत पुढील उपक्रमांना शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button