लोहा शहरात गणपती विसर्जन मोठ्या उत्साहात संपन्न ; लोहा न.पा.चे कार्यालयीन अधीक्षक उल्हास राठोड यांनी केले उत्कृष्ट नियोजन
लोहा शहरात गणपती विसर्जन मोठ्या उत्साहात संपन्न ; लोहा न.पा.चे कार्यालयीन अधीक्षक उल्हास राठोड यांनी केले उत्कृष्ट नियोजन
**************
लोहा प्रतिनिधी : लोहा शहरात दि.१७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन मोठ्या उत्साहात संपन्न झाले असुन या गणेश विसर्जनासाठी लोहा न.पा.चे कार्यालयीन अधीक्षक उल्हास राठोड यांनी केले उत्कृष्ट नियोजन.
लोहा शहरात दि.७ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी नोंदणीकृत २५ गणेश मंडळांनी श्री गणेशाची स्थापना केली तर विना परवाना छोटे -मोठे जवळपास १०० गणेश मंडळांनी श्री गणेशाची स्थापना केली होती. १० दिवस मोठ्या भक्तिभावाने श्री गणेशाची आराधना करून ११ व्या दिवशी श्री गणेशाला निरोप देण्यासाठी त्यांचे मोठ्या भक्तिभावाने लोहा शहरातून ढोल ताशा च्या गजरात मिरवणूक काढून सुनेगाव तलावात श्री गणेशाचे मोठ्या भक्तिभावाने आरती करून विसर्जन करण्यात आले.
यावेळी लोहा न.पा.च्या प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी सौ अरुणा संगेवार, प्रभारी मुख्याधिकारी तथा तहसीलदार विठ्ठल परळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोहा न.पा.चे कार्यालयीन अधीक्षक उल्हास राठोड यांनी सुनेगाव तलाव येथे श्री गणेशाच्या विसर्जनासाठी एक घाट तयार करून भोई समाज बांधव यांना पाचारण करुन तराफ्याच्या सहाय्याने श्री गणेश विसर्जन केले तसेच रस्त्यावरची खड्डे गिट्टच्या चुरीने बुजविले तसेच रात्रीला अंधारात श्री गणेशाचे विसर्जन करण्यासाठी अनेक लाईटचे फोकस लोहा न.पा.च्या वतीने लावले होते तसेच श्री गणेश भक्तांना शुध्द फिल्टर पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती.
श्री गणेश विसर्जनासाठी लोहार न.पा. चे कार्यालयीन अधीक्षक उल्हास राठोड हे स्वतः सुनेगाव तलावावर उपस्थित होते तसेच त्यांच्या सोबत लोहा न.पा.च्या स्वच्छता निरीक्षक लताबाई ढवळे, रावसाहेब नळगे , विठ्ठल दाढेल, विष्णू भिसे, आदी कर्मचारी उपस्थित होते.
तसेच पोलिस निरीक्षक ओमकार चिंचोळकर यांनी ही चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. यावेळी पोलीस उपनिरीक्षक पाटील, पोलीस कर्मचारी कारामुंगे,डी.बी.शाखेचे प्रदीपकुमार शेबांळे आदी पोलिस कर्मचारी उपस्थित होते.