सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्तासामाजिक कार्य

रसिका अर्बन को.ऑप. क्रेडिट सोसायटी चेअरमनपदी मा. श्री. गोविंदरावजी भोपणीकर साहेब, व्हा चेअरमन पदी मा.श्री. आनंद बिरादार आणि सचिव पदी मा. श्री. विश्वजित बिरादार यांची बिनविरोध निवड

रसिका अर्बन को.ऑप. क्रेडिट सोसायटी चेअरमनपदी मा. श्री. गोविंदरावजी भोपणीकर साहेब, व्हा चेअरमन पदी मा.श्री. आनंद बिरादार आणि सचिव पदी मा. श्री. विश्वजित बिरादार यांची बिनविरोध निवड

उदगीर प्रतिनिधी :  येथील रसिका अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची निवडणूक बिनविरोध संपन्न झाली असून या सोसायटीच्या चेअरमनपदी मा. श्री. गोविंदरावजी भोपणीकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

या सोसायटीच्या उपाध्यक्षपदी श्री. आनंद लक्ष्मणराव बिरादार यांची तर सचिवपदी श्री. विश्वजीत शिवकुमार बिरादार यांची निवड करण्यात आली. यावेळी सोसायटीचे संचालक मा. श्री. गजाननजी भोपणीकर, श्री. चंद्रकांत पंढरपूरे, श्री. विठ्ठल बिरादार, सौ. सोनाली दयानंद रणदिवे, श्रीमती रोहिणी भोसले, सौ. गीतांजली लांडगे, श्री. पांचाळ सूर्यकांत, सौ. आशा प्रशांत भंडे या सर्व संचालक मंडळाची उपस्थिती होती.

ही निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मा. श्री. बी. एस. शिंदे (सहकार अधिकारी, उदगीर) यांची उपस्थिती होती. यावेळी सर्व संचालक मंडळाच्या वतीने चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल मा. श्री. गोविंदरावजी भोपणीकर यांचा व सोसायटी सचिव श्री. विश्वजीत बिरादार यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button