मोखंडी हुन भोकर कडे येणाऱ्या रस्त्यावरील पुल तुटला
मोखंडी हुन भोकर कडे येणाऱ्या रस्त्यावरील पुल तुटला
****************
संततधार पावसाने नदी नाले तलाव झाले ओव्हर फ्लो
****************
भोकर( तालुका प्रतिनिधी) तालुक्यातील महाराष्ट्र सीमेच्या शेवटचे गाव तेलंगाना सीमेला लागूनच असलेल्या लोखंडी गावा जवळील भोकर कडे येणाऱ्या रस्त्यावरील पुल तुटून खरडून गेल्याने काही वेळ मार्ग बंद झाला होता.
भोकर तालुक्यात 31 ऑगस्ट पासून मुसळधार पाऊस सुरू आहे1सप्टेंबर रोजी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने तालुक्यातील नदी नाले ओढे तलाव भरून गेले आहेत2 सप्टेंबर रोजी सुद्धा सकाळपासून पावसाची संततधार चालूच होती संततधार पावसाने खरीप पिके जन्म झाली आहेत सखल भागातील शेतीमध्ये पावसाचे पाणी साचले आहे एक सप्टेंबर रोजी तालुक्यात ६६.५० मिलिमीटर पाऊस झाला तर दोन सप्टेंबर रोजी तालुक्यात ६१.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली 2 सप्टेंबर रोजी तालुक्यात पावसाचे सरासरी 677 मिलिमीटर झाली आहे
मोखंडी भोकर रस्त्यावरील पुरामुळे पुल तुटला*
**********
भोकर तालुक्यातील तेलंगाना सीमेनजीक शेवटचे गाव असलेल्या मोखंडी भोकर रस्त्यावरील पूल पुराच्या पाण्यामुळे तुटून गेला असून सर्व रस्ता खरडून गेला आहे त्यामुळे बराच वेळ या मार्गावरील वाहतूक बंद होती तहसीलदार सुरेश घोळवे यांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधितांना सतर्कतेच्या सूचना दिल्या साबा विभागाने या ठिकाणी आपले काम सुरू करून मार्ग सुरळीत करून देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत या भागातील नदीला मोठे पूर आले असून काही ठिकाणी रस्त्यावरूनही पाणी वाहत आहे मोखंडी हुन भोकर कडे येणाऱ्या मार्गावरील वाहतूक रस्ता खरडून गेल्याने बंद झाली होती बऱ्याच ठिकाणी शेतीच्या सकल भागात पाणी साचले प्रथमच नदी नाल्यांना सर्वत्र पूर आले आहेत