मानवतला सफाई कर्मचाऱ्याच्या हस्ते ध्वजारोहण तिरंगा अभियानाला मोठा प्रतिसाद
मानवतला सफाई कर्मचाऱ्याच्या हस्ते ध्वजारोहण तिरंगा अभियानाला मोठा प्रतिसाद
मानवत सौ ममता चिद्रवार
हर घर तिरंगा अभियानंतर्गत येथील नगरपालिकेत मंगळवारी ता १३ पालिकेतील जेष्ठ स्वच्छता कर्मचारी चंद्रकलाबाई भाले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .
राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान हरघर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. या निमित्ताने पालिकेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक कोमल सावरे यांचा प्रमुख उपस्थितीत पालिकेच्या ज्येष्ठ कर्मचारी चंद्रकलाबाई गोविंद भाले यांच्या हस्ते ध्वजारोहण सकाळी ७.५५ मिनिटांनी करण्यात आले . यावेळी नगरपरिषद कार्यालयाचे सर्व कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.
मॅरेथॉन रॅलीला प्रतिसाद हरघर तिरंगा अभियानांतर्गत शहरात नगरपालिकेच्या वतीने मंगळवारी ता १३ नगरपालिकेपासून मुख्य रस्त्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारकासमोर तिरंगा रॅली काढण्यात आली . या रॅलीत तहसीलदार पांडुरंग माचेवाड , पोलीस निरीक्षक संदीप बोरकर , मुख्याधिकारी कोमल सावरे यांचेसह कर्मचारी व नागरिक सामील झाले होते .