मानवतला नेत्ररोग शिबीरात १६५ रुग्णांची तपासणी
मानवतला नेत्ररोग शिबीरात १६५ रुग्णांची तपासणी
६० रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया
मानवत प्रतिनिधी – उदयगिरी लायन्स धर्मादाय नेत्र रुग्णालय उदगीर व जिल्हा अंधत्व निवारण समिती लातूर यांच्या वतीने स्वर्गीय श्रीमती गंगाबाई मोहनलाल मंत्री यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ मंगळवारी ता १६ घेण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबीरात एकूण १६५ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून शिबिरात पात्र ६० रुग्णांवर उदगीर येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे .
शहरातील मेन रोडवरील माहेश्वरी मंगल कार्यालयात झालेल्या या शिबिराचे उदघाटन सकाळी १० वाजता उदयगिरी ट्रस्टचे सचिव ईश्वरप्रसाद बाहेती , शिबिर संयोजक नंदलाल मंत्री यांच्या हस्ते करण्यात आले . शिबिरात डॉ नेहा भराडिया ,डॉ प्रमोद जमादार , सचिन निलंकर , सुरेश तिवारी , श्रीकांत सावंत यांनी रुग्णांची तपासणी केली . शिबिरात पात्र ६० रुग्णापैकी ३६ रुग्ण उदगीर येथे शस्त्रक्रियेसाठी मंगळवारी ता १६ पाठविण्यात आले आहेत .
शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ विजयकुमार तोष्णीवाल, डॉ विनोद सोमाणी, सचिन बिर्ला, रुपेश काबरा, पंकज लाहोटी, शैलेश काबरा, डॉ सचिन चिद्रवार, रामानंद मंत्री, जगदीश मंत्री, जगदीश लाहोटी, योगेश तोष्णीवाल, सुदर्शन मंत्री, संजय बाहेती, दिनेश मानधना, प्रकाश करपे यांनी प्रयत्न केले .