Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्तासरकारी योजनासामाजिक कार्य
मानवतला जिल्हा पोलिस अधीक्षकाचे व्याख्यान
मानवतला जिल्हा पोलिस अधीक्षकाचे व्याख्यान
पत्रकार संघ गणेश मंडळाचा उपक्रम
मानवत प्रतिनिधी
मानवत तालुका पत्रकार संघ गणेश मंडळाच्या वतीने शनिवारी ता १४ सकाळी ११ वाजता समाज माध्यमांचा वापर व आजची तरुणाई या विषयावर परभणी जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील के के एम महाविद्यालयाच्या स्व पन्नालाल चांडक यांचे सभागृहात सदरील व्याख्यान होणार आहे.
कार्यक्रमास नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मानवत तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय नाईक, सचिव प्रसाद जोशी, मोहन बारहाते, गोपाळ लाड, श्याम झाडगावकर, जिल्हा उपाध्यक्ष डॉ सचिन चिद्रवार, सचिन मगर, दिगंबर बाकळे, पांडुरंग जाधव, दशरथ शिंदे, रामेश्वर काष्टे, ऍड मुकुंद पाटील, आश्रोबा केदारे, अनिल चव्हाण, प्रवीण घागरे, राम दहे आदींनी केले आहे.