आपल्यला लोन पाहिजे का ?
Homeआपला महाराष्ट्र

मानवत येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न!

मानवत येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न!

विद्यार्थ्यांनी आयुष्यात येणारे अडथळे बाजूला सरत यशाचं शिखर गाठाव – सौ.प्रेरणाताई वरपुडकर

मानवत तालुका प्रतिनिधी- वरपुडकर एज्युकेशन फाऊंडेशन संचालित रॉयल क्लिफ वर्ल्ड स्कूल, मानवत च्या वतीने संस्थेच्या सचिव सौ.प्रेरणाताई वरपुडकर यांनी काल दिनांक 23 जून रोजी पाथरी विधानसभा मतदार संघातील गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ माऊली मंगल कार्यालय मानवत येथे आयोजित करण्यात आला होता. 10 वी, 12 वी, NEET, JEE, CET परीक्षेत नावीन्यपूर्ण यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला. तसेच मानवत मधील मुलींच्या कब्बडी संघाचा देखील या वेळी सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाथरी विधानसभेचे आमदार सुरेशराव वरपुडकर तर प्रमुख मार्गदर्शक प्रा.विठ्ठल कांगणे हे होते.

या गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात 10 वी परीक्षेत 99.20 टक्के गुण प्राप्त केलेले विद्यार्थी सृष्टी ज्ञानेश्वर माकोडे व लक्ष्मण हरिभाऊ ठाकरगे, 12 वी परीक्षेत 89 टक्के गुण गुणांसह उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी संस्कृती भागवत पोकळे, NEET परीक्षेतील गुणवंत पार्थ दत्ता रोकडे (690) मयूर मधुकर कदम (665) भगवान मारोती काळे (657) प्रसाद उंबरकर (654), कुसुमकर सचिन (660) प्रमोद रासवे (650), मैनावती नवघरे (650) मोहिनी होगे (643) स्वराज यादव (632) सिद्धेश्वर ताल्डे, MHT-CET मध्ये 99 टक्के गुण घेणारे वडकिले तुषार, हालगे वेदांत व संकेत खुडे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच 10 वी व 12 परीक्षेत 80 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्या व NEET, JEE, CEE मध्ये कौतुकास्पद यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला. तसेच स्पर्धा परीक्षेत यश संपादित करून ITI प्राचार्य पदी निवड झालेले विशाल थिटे यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला.

आ.सुरेशराव वरपुडकर यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना साडेचार तास विधिमंडळाच्या कामकाजविषयी मार्गदर्शन केल्याची आठवण प्रा.विठ्ठल कांगणे यांनी सांगितली. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचा अभिमान वाढवण्यासाठी मेहनत घेऊन अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करावं व यशाचं शिखर गाठावं आसं मनोगत प्रा.विठ्ठल कांगणे यांनी व्यक्त केलं.

कार्यक्रमाच्या आयोजक सौ.प्रेरणाताई वरपुडकर यांनी आयुष्यात येणारे अडथळे बाजूला सारून विद्यार्थ्यांनी आपलं ध्येय गाठावं आसं मत या प्रसंगी व्यक्त केलं. तर आ.सुरेशराव वरपुडकर यांनी देखील अध्यक्षीय भाषणात गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास मुख्याध्यापीका अर्चना शुक्ला, बाबुराव नागेश्वर, बाबाजी अवचार, भोसले सर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शिरीष लोहट यांनी सूत्रसंचालन केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button