आपल्यला लोन पाहिजे का ?
Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताराजकारणशेती विषयीसरकारी योजनासामाजिक कार्य

माझी वसुंधरा 4.0 अभियानामध्ये नगरपरिषद मानवतने उल्लेखनीय कामगिरी करत पटकावला तृतीय क्रमांक

माझी वसुंधरा 4.0 अभियानामध्ये नगरपरिषद मानवतने उल्लेखनीय कामगिरी करत पटकावला तृतीय क्रमांक
50 लाखाचे पारितोषिक जाहीर

मानवत प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाने माझी वसुंधरा अभियान 4.0 सर्वेक्षण अहवाल नुकताच घोषित केला असून अंतर्गत नगरपरिषद मानवत ने श्रीमती कोमल सावरे मुख्याधिकारी तथा प्रशासक यांच्या मार्गदर्शनाखाली उल्लेखनीय कामगिरी करत छत्रपती संभाजी नगर विभागातून (मराठवाडा) तृतीय क्रमांक पटकावला आहे. याचे सर्वत्र कौतुक होत असून मानवत शहरातील नागरिक व कर्मचारी यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.नगर परिषद मानवत ने तृतीय क्रमांक मिळवत 50 लक्ष रुपयांचे पारितोषिक मिळवले आहे.
माझी वसुंधरा अभियान हा एक महत्त्वकांक्षी उपक्रम आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पर्यावरणाच्या सुधारणेसाठी निसर्गाच्या पाच घटकांचा (पंचमहाभूते) यामध्ये १.भूमी (पृथ्वी),२. वायु (हवा),३. जल (पाणी),४. अग्नी (ऊर्जा), व ५. आकाश यांचा समावेश होतो. याचे प्रमुख उद्दिष्ट हरित कव्हर आणि जैवविविधतेचे संवर्धन करणे, घनकचरा व्यवस्थापन करणे, हवा गुणवत्ता निरीक्षण आणि वायू प्रदूषण कमी करणे, जलसंधारण, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि पाझर याविषयी काम करणे, जलस्त्रोत तसेच नद्यांची स्वच्छता आणि पुनरुज्जीवन करणे, सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावणे, नवीकरणीय ऊर्जेचा वापर व प्रचार करणे, पर्यावरण सुधारणा आणि संरक्षण याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, इत्यादी उद्दिष्टे आहेत. या सर्व प्रक्रियेमध्ये व उपक्रमांमध्ये नागरिकांचा सहभाग हा महत्त्वाचा असतो व नागरिकांमुळे या सर्व गोष्टी शक्य होत असतात. असे म्हणतात ना असाध्य ते साध्य करिशी सायास.
माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये मानवत नगरपरिषदेने उल्लेखनीय कामगिरी करत असताना शहरातील सर्व नागरिकांनी यामध्ये भरभरून प्रतिसाद व सहकार्य केले, नगरपरिषद स्वच्छता विभागातील सर्व कर्मचारी यांनी अहोरात्र परिश्रम घेतले व तसेच नगरपरिषद कर्मचारी अधिकारी यांनी सुद्धा यामध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे यामुळेच सदरील नामांकन या कार्यालयास प्राप्त झाले आहे याबद्दल श्रीमती कोमल सावरे मुख्याधिकारी तथा प्रशासक नगरपरिषद मानवत यांनी शहरातील नागरिक, अधिकारी,कर्मचारी, सामाजिक संस्था आणि मित्रमंडळे यांचे आभार मानले आहेत व असेच सहकार्य यानंतरही राहू द्यावे जेणेकरून नगरपरिषद मानवत ची अजूनही उल्लेखनीय कामगिरी करत वरचे नामांकन प्राप्त करता येईल असे आवाहन केले.
या सर्व प्रक्रियेमध्ये श्रीमती कोमल सावरे मुख्याधिकारी तथा प्रशासक नगरपरिषद मानवत व इतर कर्मचारी यामध्ये श्री सय्यद अन्वर, नगर अभियंता,श्री मंगेश खोडवे, लेखापाल, श्री महेश कदम लेखापाल, श्री भगवानराव शिंदे, श्री रामराव चव्हाण, श्री भारत पवार, श्री राजेश शर्मा, श्री विनय आडसकर,श्री शतानिक जोशी, श्री संतोष खरात, श्री. अजय उडते, श्री संतोष उन्हाळे, श्री हनुमंत बिडवे,श्री संजय रुद्रवार, श्री दीपक सातभाई, श्री मनमोहन बारहाते, श्री भगवानराव बारटक्के, श्री रवि दहे, श्री पंकज पवार,श्री सचिन सोनवणे, श्री नारायण व्यवहारे, श्रीमती वंदना इंगोले, श्रीमती शितल सोळंके, श्री मुंजाभाऊ डोळसे, श्री सोनाजी काळे, श्री नारायण काळे, श्री.संजय कुऱ्हाडे, श्री एम स्वामी, श्री अलीम, श्री जावेद मिर, श्री निवृत्ती लाड, श्रीमती सीमा कंची, श्रीमती सुनीता वाडकर, भारती भदर्गे, श्री सुनील कीर्तने, श्री दीपक भदर्गे, यांचा सहभाग होता.
याचबरोबर स्वच्छता विभागातील स्वच्छता निरीक्षक श्री मुंजाभाऊ गवारे, व श्री वसीम शेख,स्वच्छता
शहर समन्वयक यांनी श्रीमती कोमल सावरे मुख्याधिकारी तथा प्रशासक यांच्या मार्गदर्शनाखाली अहोरात्र परिश्रम घेतले याबद्दल मुख्याधिकारी यांनी यांचे स्वागत केले आहे.
ज्याप्रमाणे आतापर्यंत शहरातील नागरिक, कर्मचारी, मित्रमंडळांनी व सामाजिक संस्थांनी ज्या पद्धतीने सहभाग नोंदविला त्याचप्रमाणे यानंतरच्या वेगवेगळ्या उपक्रमामध्ये व स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवावा जेणेकरून आपल्या शहराला राज्य पातळीवरती व देशपातळीवरती वेगवेगळे नामांकन प्राप्त होतील या करिता सर्व नागरिकांना अशा प्रकारचे आवाहन नगर परिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक श्रीमती कोमल सावरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button