महाराष्ट्रातील एकाही आमदाराने ओबीसी आरक्षणासंदर्भात पत्र दिले नाही- प्रा.लक्ष्मण हाके
महाराष्ट्रातील एकाही आमदाराने ओबीसी आरक्षणासंदर्भात पत्र दिले नाही- प्रा.लक्ष्मण हाके
****************
भोकर (तालुका प्रतिनिधी)ओबीसी समाजाला घटनेनुसार आरक्षण मिळालेल आहे मात्र सद्यस्थितीत ओबीसींचे आरक्षण धोक्यात आले असून अनेक ठिकाणी मोर्चे आंदोलने उपोषणे करण्यात येत आहेत महाराष्ट्रातील 288 आमदारांपैकी एकाही आमदाराने ओबीसी आरक्षणासंदर्भात विधानसभागृहात पत्र दिले नाही याबाबत मात्र मोठी खंत फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात वाटते आहे असे मत ओबीसी आरक्षणाचे योद्धे प्रा.लक्ष्मण हाके यांनी भोकर येथील ओबीसी आरक्षण बचाव मेळाव्यात् बोलताना व्यक्त केले.
भोकर येथे दि.18 ऑगस्ट 2024 रोजी मोंढा मैदानात ओबीसी आरक्षण बचाव मेळावा घेण्यात आला तत्पूर्वी भोकर शहरातून आदिवासी नृत्य बंजारा नृत्य वासुदेव गोंधळी आदी पारंपारिक नृत्यासह प्रा.लक्ष्मण हाके यांची शहरातून भव्य मिरवणूक करण्यात आली ठीक ठिकाणी जेसीबी द्वारे फुले उधळण्यात आली त्यानंतर घेण्यात आलेल्या जाहीर सभेत बोलताना प्रा.लक्ष्मण हाके पुढे म्हणाले मागील शेकडो वर्ष ओबीसी समाजाने अपमान अन्याय सहन केला म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये ओबीसीसाठी आरक्षण दिलं त्यावेळी त्यांना प्रचंड विरोध झाला त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला,मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार पंतप्रधान व्ही.पी.सिंग यांनी 1994 साली ओबीसींना आरक्षण दिलं मात्र हे आरक्षण आज धोक्यात आले असून आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण द्या म्हणून मागणी करणारे लोक पुढे येत आहेत खासदार,आमदार ,कारखानदारी,शिक्षण संस्था असताना सुद्धा त्यांना आरक्षण पाहिजे तर घटनेमध्ये तरतूद असणाऱ्या ओबीसी समाजाचे आरक्षण कसे काय हिरावल्या जाते?
त्यासाठी ओबीसी आरक्षणाचा लढा सुरू झाला आहे, ओबीसी समाजाने आजपर्यंत लोकांना आपली सेवाच दिली आहे ,आता ओबीसी सर्व नवे पर्व हा लढा सुरू झाला आहे,आपल्या विचारांची माणसं आता सत्तेत पाठवावी लागतील 60 टक्के संख्येने असणाऱ्या ओबीसी समाजाला एक टक्का बजेटमध्ये तरतूद आहे,56 हजार कुणबी प्रमाणपत्र वाटल्या जातात हे फार मोठे षडयंत्र आहे सर्व ओबीसी समाज एकत्र झाला तर तुम्हाला सरपंच देखील होता येणार नाही,घराणेशाही चालवली जात आहे,छत्रपती शिवरायांच्या राज्यात 18 पगड जातीची माणसं होती, संत गाडगेबाबा,संत सेवालाल,महात्मा बसवेश्वर आदी महापुरुषांच्या विचारांचा हा महाराष्ट्र आहे, ओबीसींची केवळ मते पाहिजे,त्यांच्या उपोषणाकडे बघितलं जात नाही म्हणून आता ओबीसींना विचार करावा लागेल,तुमचं आरक्षण डावळल्या जात असताना आता शांत बसू नका पक्ष्यांची मोजणी केली जाते मात्र ओबीसींची जनगणना केली जात नाही,राजसत्ता मागून मिळत नाही तर ती हिसकावून घ्यावी लागते,हिमतीने उभे राहा,मत पेटीतून आपला विचार दाखवून द्या असेही शेवटी ते म्हणाले नवनाथ वाघमारे यांनीही परखड मनोगत व्यक्त केले या मेळाव्यास नामदेवराव आयलवाड,नागनाथ घीसेवाड,गोविंद बाबा गौड,संतोष आलेवाड,सुरेश बिल्लेवाड,सतीश देशमुख एड.शेखर कुंटे,संदीप पा.गौड,माधवराव अमृतवाड, नागोराव शेंडगे,सुभाष नाईक, एड.परमेश्वर पांचाळ यांच्यासह जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर ओबीसी कार्यकर्ते उपस्थित होते सूत्रसंचालन अंबादास अटपलवाड यांनी केले तर आभार बी.आर.पांचाळ यांनी मानले.