महाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटनेच्या विविध मागण्यासाठी मंत्रालयात पाठपुरावा
महाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटनेच्या विविध मागण्यासाठी मंत्रालयात पाठपुरावा
**************
भोकर तालुका प्रतिनिधी बी.आर.पांचाळ – महाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटनेच्या राज्य व जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने मंत्रालय मुंबई येथे ग्रामविकास व पंचायत राज विभाग अप्पर मुख्य सचिव यांची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा करून पाठपुरावा करण्यात आला.
12 व 13 जून 2024 रोजी या शिष्टमंडळाने खुलर समितीकडे संघटनेस सुनावणीसाठी आमंत्रित करणे, एक पद रद्द करणे, पंचायत विकास अधिकारी बदल्या बाबत, सेवा जेष्ठता साठी कंत्राटी काळ धरणे, ग्रामसेवकांना जुनी पेन्शन लागू करणे, पुरस्कार मिळालेल्या ग्रामसेवकांना वेतन वाढ करणे, ग्रामसेवक पुरस्कारासाठी प्रश्नावलीत बदल करणे आदी विषयावर चर्चा करून पाठपुरावा करण्यात आला यावेळी राज्याध्यक्ष नितीन धामणे, राज्यसचिव हरिश्चंद्र काळे, कार्याध्यक्ष मधुकर मंगल, राज्य सहसचिव प्रेमदास पवार, सातारा जिल्हाध्यक्ष नारायण पवार, छ.संभाजी नगर जिल्हाध्यक्ष सुरेश चौधरी, नांदेड जिल्हा अध्यक्ष गुलाब वडजे, सोलापूर जिल्हाध्यक्ष कुशबा इंगळे, अहमदनगर जिल्हा सचिव शशिकांत नरोडे, सोलापूर जिल्हा सचिव अभिमन्यू ताड यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते