महाराष्ट्र खोखो संघ निवड समिती सदस्य पदी श्री अमोल मुटकुळे यांची निवड
महाराष्ट्र खोखो संघ निवड समिती सदस्य पदी श्री अमोल मुटकुळे यांची निवड
वसमत प्रतिनिधी : भारतीय खोखो महासंघाच्या वतीने आयोजित 34 व्या राष्ट्रीय सब ज्युनिअर खोखो स्पर्धा 2024-25 दि. 28 सप्टेंबर ते 2 आॕक्टोंबर 2024 झारखंड येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्राचे किशोर व किशोरी खोखो संघ सहभागी होणार आहेत. तसेच वडोदरा, गुजरात येथे 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2024 पश्चिम विभागीय खेलो इंडिया महिला लीग स्पर्धा होणार आहे. यामध्ये महाराष्ट्राचा किशोरी संघ सहभागी होणार आहे.
यासाठी 15 सप्टेंबर 2024 रोजी धाराशिव ( उस्मानाबाद ) येथे खेळाडू निवड चाचणी चे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र खोखो संघटनेने महाराष्ट्राचा खोखो संघ निवड करण्यासाठी वसमत येथील खोखो राष्ट्रीय पंच श्री अमोल मुटकुळे यांची निवड समिती सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.
या निवडी बद्दल हिंगोली जिल्हा खोखो असोसिएशन चे अध्यक्ष तथा शिवेश्वर नागरी सहकारी बँक वसमतचे अध्यक्ष श्री शिवदास बोड्डेवार, जिल्हा खोखो संघटनेच्या उपाध्यक्षा मनीषा काटकर, उपाध्यक्ष संदीप सोनी, महाराष्ट्र खोखो असोसिएशन तांत्रिक समितीचे अध्यक्ष तथा हिंगोली जिल्हा ॲम्युचर खोखो असोसिएशन चे सचिव प्रा.डॉ.श्री. नागनाथ गजमल सर, शिवाजी कट्टेकर, मिनानाथ गोमचाळे, प्रा डॉ अनिल मुगुटकर, बालासाहेब कोसलगे, प्रवीण शेळके, नाना शिंदे, सुरज शिंदे, चिरंजीवी कट्टा, मनोज टेकाळे यांनी श्री. अमोल मुटकुळे यांचे अभिनंदन केले आहे.