मत्स्य विज्ञान महाविद्यालय उदगीर येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस अतिशय उत्साहात साजरा

उदगीर प्रतिनिधी:
दि. 21 जून 2025 मत्स्य विज्ञान महाविद्यालय उदगीर येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी प. पु. निर्मलादेवी माताजी योग ट्रस्ट नवी दिल्ली मार्फत योग व ध्यान शिबिराचे आयोजन महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. बी. आर. खरटमोल यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून श्री. नितीन कल्याणी, जिल्हा समन्वयक. सहज योग, लातुर हे होते. तसेच श्रीमती मृणाल जावखेडकर, पुणे यांनी योग व ध्यान या विषयावर प्रात्यक्षिकासहित सखोल मार्गदर्शन केले. महाविद्यालयच्या रासेयोचे प्र. अधिकारी डॉ. मिलिंद गिरकर यांनी कार्यक्रम समन्वयक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमामध्ये सहज योग केंद्राचे श्री. राजकुमार पिनाते, श्रीमती अर्चना नळगीरकर तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. आदिनाथ मरकड, डॉ.विजयकुमार सुतार, डॉ.अजय कुलकर्णी, डॉ.संतोष कुंजीर व कर्मचारी श्रीमती शोभा तांदळे, श्री. नितीन बिरादार, चंद्रकांत मादळे तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते.