भोकर येथे आर्ट ऑफ लीव्हिंगचा हैपिनैस कार्यक्रम

भोकर येथे आर्ट ऑफ लीव्हिंगचा हैपिनैस कार्यक्रम
************
भोकर (तालुका प्रतिनिधी ) प.पू. श्री श्री रविशंकरजी यांचा , आर्ट ऑफ लिव्हिंग 6दिवशीय कार्यक्रम भोकर येथे जयकेदारनाथ कौम्पलैक्स मध्ये आयोजित करण्यात आला होता समारोपीय हॅपिनेस कार्यक्रम दि 20 एप्रिल रोजी पार पडला .
शहरातील व्यापारी, अधिकारी, युवक ,गृहिणी अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील 40 हून अधिक साधकांनी यात सहभागी होऊन आनंदाची अनूभूती घेतली यात योगासने , प्राणायाम , सूदर्रशन क्रिया शिकल्याने याचा नियमितपणे पूढेही अभ्यास आपण करून जीवन उत्सव म्हणून साजरा करण्याचा संकल्प सहभागींनी घेतला.
मानवीय मूल्यांचा अविष्कार या दरम्यान झाल्याने समारोपाच्या दिवशी सहभागींनी शहरातील श्री पशूपतिनाथ मंदिर व परिसरात स्वच्छता मोहीम राबवून श्रमदान केले.
भोकर शहरात मागील 22 वर्षापासून आर्ट ऑफ लिव्हिंगचे कार्य सुरु असून येथे नियमितपणे साधकांसाठी फालौअप व प्रोग्राम सुरू असतात म्हणून याचा लाभ शहरातील सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंगचे वरिष्ठ प्रशिक्षक राजेश्वर भूरे यांनी केले आहे.
सदरिल सहा दिवसीय कार्यक्रमासाठी प्रशिक्षक राजेश्वर भूरे , अरूणा भूरे , डॉ विठ्ठल माने होते तर व्हालेंटिअर सोपान तोटावाड , मनीषा साकळकर, डॉ मनीषा माने, आकाश गौड आदींनी सहभाग घेतला.