भोकर येथील महा-ई-सेवा केंद्र ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगाना ठरते आहे धोकादायक:
भोकर येथील महा-ई-सेवा केंद्र ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगाना ठरते आहे धोकादायक: लोखंडी शिड्या चढून जावे लागते दुसऱ्या मजल्यावर
**************
प्रहार क्रांती संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा
***********
भोकर (तालुका प्रतिनिधी) शहरातील तहसील कार्यालयासमोर असलेले महा-ई-सेवा केंद्र हे लोखंडी पायऱ्या चढून दुसऱ्या मजल्यावर जावे लागते त्यामुळे जेष्ठ नागरिक व दिव्यांगाना धोकादायक ठरले असून सदर ई-सेवा केंद्र इतरत्र सोयीच्या ठिकाणी हलवावे अन्यथा प्रहार क्रांती संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.
भोकर तहसील कार्यालयासमोर दुसऱ्या मजल्यावर असलेले महा ई सुविधा केंद्र हे अत्यंत अडचणीच्या ठिकाणी आहे लोखंडी पायऱ्या चढून धोकादायक स्थितीमध्ये जावे यावे लागते, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगणा वर जाण्या येण्यासाठी मोठी अडचण होत आहे अनेक वेळा नागरिकांचे अपघातही झाले आहेत सदर ई सुविधा केंद्र मध्ये दर पत्रक लावण्यात आलेले नाही तिथे जाणाऱ्या नागरिकाकडून अधिक पैसे वसूल केले जातात उद्धटपणाची भाषा वापरली जाते कामे वेळेवर होत नाहीत याबाबत अनेक वेळा तहसील कार्यालयाकडे तक्रारी करून सुद्धा या महा-ई सुविधा केंद्रच्या कारभाराकडे दुर्लक्ष केल्या जात आहे त्यामुळे दिव्यांग जेष्ठ नागरिक व सर्वसामान्य नागरिक यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे सुविधा केंद्र नसून या ठिकाणी असुविधाच अधिक झाल्या असल्याने नागरिकातून संताप व्यक्त केल्या जात आहे महसूल विभागाचे अधिकारी याकडे गेले काही वर्षापासून दुर्लक्ष करीत असल्याने प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजेश चंद्रे यांनी उपविभागीय अधिकारी भोकर यांना निवेदन देऊन सदर ई सुविधा केंद्र सोयीच्या ठिकाणी हलविण्यात आले नाही तर 14 ऑगस्ट पासून अपंग दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे वेळेप्रसंगी आमरण उपोषणही करण्यात येईल असेही निवेदनात म्हटले आहे निवेदनावर जिल्हा संपर्क प्रमुख राजू इबितवार, एमडी सोनकांबळे, बालाजी कोकणे दत्ता बोईनवाड विठ्ठल जुजुकर ,खंडू दाडेराव, परमेश्वर गायकवाड अमोल भालेराव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.