भोकर मध्ये आषाढी निमित्त झाला विठ्ठल नामाचा गजर

भोकर मध्ये आषाढी निमित्त झाला विठ्ठल नामाचा गजर
************
अभंग व भक्ती गीताच्या तालावर श्रोत्यांनी धरला ठेका
*************
स्थानिक कलावंतांनी सजवली संगीताची बहारदार मैफिल
************
भोकर( तालुका प्रतिनिधी )आषाढी एकादशीचा महोत्सव म्हणजे श्रद्धेचा महासागर आणि भक्तीचा अपार झरा, विठ्ठल नामाचा अखंड गजर, लाखो वारकरी पायी दिंडीत सहभागी होऊन विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात भोकर वाशियांसाठी भक्तीचा व विठ्ठल नामाचा गजर या सोहळ्याचा लाभ घेता यावा या हेतूने गणराज रिसॉर्ट अँड मंगल कार्यालयाचे मालक गणराज सादुलवार यांच्या वतीने विठ्ठल नामाचा गजर हा अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता स्थानिक कलावंत सुप्रसिद्ध गायक आणि वादकांनी या कार्यक्रमात सादर केलेल्या भक्ती गीतांनी श्रोते चिंब न्हावून गेले होते अक्षरशः प्रेक्षकांनी तालावर ठेकाच धरला.
6 जून रोजी सायंकाळी 7 वाजता विठ्ठलाची पूजा आणि दीप प्रज्वलन करून गणराज रिसॉर्ट मंगल कार्यालय येथे कार्यक्रमाची सुरुवात झाली सामूहिक राम कृष्ण हरी गजर झाला त्यानंतर ह.भ.प विष्णु महाराज तांदळीकर, प्रा. प्रणव पडोळे, प्रा.गणेश काकीलवाड, युवा गायक शिव कुमार मठपती, सौ. शिवकांता पडोळे, रिया यलमेवाड, सपना गायकवाड, बालाजी वाघमारे, बी.आर. पांचाळ आदि गायकांनी अभंग आणि भक्ती गीते सुंदर प्रकारे सादर केली सुंदरते ध्यान, कानडा राजा पंढरीचा, सावळ्या विठ्ठला, विठूचा गजर हरिनामाचा,,बघ उघडोनी दार, चल ग सखे पंढरीला, खेती करो हरिनाम की, अवघे गरजे पंढरपुर, धरीला पंढरीचा चोर, पावलो पंढरी, विठ्ठलाच्या पायी, चला हो पंढरी जाऊ, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, या पंढरपुरात काय वाजत गाजत अशा अनेक अभंग व भक्तिगीतांनी भक्तिमय वातावरण झाले होते श्रोते विठ्ठल नामाच्या गजरात न्हावून गेले होते, अनेकांनी गाण्याच्या तालावर ठेका धरला, बहारदार झालेल्या गायनाने पंढरपूर अवतरले होते मृदंगाची साथ कृष्णा पांचाळ, तबला गणेश इंगोले, कीबोर्ड साहेबराव कांबळे,पॅड संतोष बुरुडे यानी साथ संगत केली या कार्यक्रमाची संकल्पना बी. आर. पांचाळ यांची होती त्यांनी सुरेख सूत्रसंचालनही केलं, बालाजी वाघमारे यांनी साथ दिली आभार चंद्रकांत चक्रवार यांनी मानले या बहारदार संगीत कार्यक्रमाचे अनेक मान्यवरांनी भरभरून कौतुक केले. शहरातील श्रोतावर्ग महिला मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते