Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताशेती विषयी
भोकर तालुक्यात विज पडून शेतकरी जखमी
भोकर तालुक्यात विज पडून शेतकरी जखमी
***************
भोकर (तालुका प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे नांदा बु. येथील शेतकरी शेतात काम करीत असताना अचानक वीज पडल्याने गंभीर जखमी झाले त्यांना भोकर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले आहेत.
नांदा बु. येथील शेतकरी दत्ता लक्ष्मण मोतेकर हे आपल्या शेतात काम करीत असताना 16 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता च्या दरम्यान पाऊस सुरू झाला आणि वीज कोसळली मोतेकर हे गंभीर जखमी झाले त्यांना तात्काळ भोकर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यांची प्रकृती चांगली झाली असल्याचे सांगण्यात आले तहसीलदार सुरेश घोळवे यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन शेतकऱ्यांशी भेटून विचारपूस केली