भोकर तालुक्यात वन्य प्राण्यांकडून पीकांचे नुकसान होणाऱ्या 6 गावांना कुंपण जाळी साठी अनुदान वाटप
भोकर तालुक्यात वन्य प्राण्यांकडून पीकांचे नुकसान होणाऱ्या 6 गावांना कुंपण जाळी साठी अनुदान वाटप
******************
खा.अशोक चव्हाणांच्या पाठपुराव्यास यश
***************
भोकर (प्रतिनिधी) रात्रंदिवस शेतामध्ये राहून कष्टाने शेतात उगवलेल्या पिकांचे वन्य प्राणी मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात, दुसरीकडे निसर्गही साथ देत नाही या सर्व अडचणीमुळे शेतकरी हैराण झाले आहेत या गंभीर समस्येबाबत शेतकऱ्यांनी मागणी केल्यानुसार माजी मुख्यमंत्री तथा खा. अशोक चव्हाण यांनी वन्यप्राण्यांना आवर घालण्यासाठी पाठपुरावा केला असून वन विभागामार्फत शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी संवेदनशील गावांसाठी सौरऊर्जावर चालणारी कुपंण जाळी साठी अनुदान देऊन वन्यप्राण्यांना बंदोबस्त केल्याने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त केले जात आहे.
भोकर तालुका तसा माळरानाचा भाग जंगलही बऱ्यापैकी वाढलेले असल्याने मागील अनेक वर्षापासून शेतकऱ्यांनी शेतामध्ये टाकलेले पीक जमिनीच्या वर येतात वन्यप्राणी मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान करून नासधूस करत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे तालुक्यात मागील अनेक वर्षांपासून कमीअधिक प्रमाणात पाऊस होत आहे. पर्यावरणाचे संतुलन बिघडल्याने अवकाळी पाऊस,गारपीट,वादळी वारा असे संकट पाठ सोडायला तयार नाही.परिणामी खरीप व रब्बी हंगामातील उत्पन्नात मोठी घट होत आहे.दुसरीकडे मालाला हमीभाव मिळत नाही. यामुळे बळीराजा दरवर्षीच आर्थिक संकटात सापडलेला असतो कर्जबाजारी होऊन शेताची पेरणी करायची आणि तोंडावर आलेला घास कधी निसर्गाकडून तर कधी वन्यप्राण्याकडून पळविला जातो अशा अनेक समस्या दरवर्षीच निर्माण होत असल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे .
6 गावातील शेतकऱ्यांना मिळाला दिलासा
********
भोकर तालुक्यात खरीप रब्बी पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे वन्य प्राणी रात्रीच्या वेळी पिकांची नाच दिवसा करून टाकतात हाती आलेला तोंडचा घास पळवून नेतात या बाबतीत वनक्षेत्र विभागाकडे अनेक वेळा शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या यासंदर्भात माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी वन विभागाशी संपर्क साधून त्यांच्या मार्फत शेतकऱ्यांसाठी हे अनुदान देण्यात आल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे इतर गावासाठी सुद्धा हे अनुदान उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहेतालुक्यात मागील तीन चार वर्षांपासून ज्या भागातील शेती पिकांचे वन्यप्राण्यांकडुन सतत नुकसान होत आहे अशा संवेदनशील असलेल्या भुरभुशी, थेरबन, आमठाणा, नेकली, धावरी(खूर्द), धावरी (बुर्दूक) गावातील पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. डॉ.श्यामप्रसाद मुखर्जी जन-विकास योजने अंतर्गत निवड निकष लागू राहील.प्रति लाभार्थीसाठी ७५ टक्के शासन अनुदान तर २५टक्के लाभार्थीनी भरणे आवश्यक. वनगुन्हा असल्यास लाभ मिळणार नाही.पात्र लाभार्थ्यांनी वनव्यवस्थापन समितीकडे अर्ज सादर करावी,कुंपणाची देखभाल दुरुस्ती लाभार्थ्यांनी करावी, हस्तांतरित कींवा विक्री करता येणार नाही. पिक काढणी नंतर कुंपण हटविणे बंधनकारक. असे नियम व अटी सदर योजनेमध्ये आहेत